फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Abhishek Sharma – Travis Head : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद चे फलंदाज पुन्हा त्यांच्या फॉर्ममध्ये आलेले पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिला सामना हैदराबादचा झाला होता. यामध्ये हैदराबादच्या संघाने धावांचा पाऊस पडला होता. त्यानंतर संघाला सलग चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी कमालीची फलंदाजी केली आणि पंजाबच्या खेळाडूंना त्यांचेच पाणी पाजले आहे. या सीझनमध्ये अभिषेक शर्मा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत होते.
अभिषेक शर्माने पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये सर्व कसर काढली आहे आणि या सामन्यात त्याचे या सीझनचे पहिले शतक नावावर केले आहे. अभिषेक शर्माने संघासाठी ४० चेंडुंमध्ये १०० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६ षटक आणि ९ चौकार ठोकले. त्याने त्याच्या धुव्वादार खेळीने आज चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. तर दुसऱ्या डोकाला असलेला ट्र्व्हिस हेडने संघासाठी ३७ चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. आज पंजाब किंग्सला पहिल्या विकेट साठी मोठी काटकसर करावी लागली. १२.२ ओव्हरला हैदराबादच्या संघाने पहिला विकेट गमावला.
𝗕𝗥𝗘𝗔𝗧𝗛𝗧𝗔𝗞𝗜𝗡𝗚 💯🔥
A scintillating CENTURY for Abhishek Sharma in just 4⃣0⃣ deliveries 🤯
Did you get a chance to catch your breath? Because we didn’t 😮💨
Updates ▶ https://t.co/RTe7RlXDRq#TATAIPL | #SRHvPBKS pic.twitter.com/OiMlBA7yrw
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
मागील पाच सामन्यांमध्ये अभिषेक शर्माची बॅट शांत राहिली होती. तो संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही वारंवार खराब कामगिरीमुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. पण आजच्या सामन्यांमध्ये संघासाठी दोन्ही हैदराबादच्या सलामीवीर फलंदाजानी पंजाबच्या गोलंदाजांचा घाम गाळला आणि स्टेडियमच्या बाहेर धावांचा पाऊस पडला. अभिषेक शर्माने आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद गतीने शतक ठोकले आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर ट्रॅव्हिस हेड आहे त्याने ३९ चेंडूंमध्ये शतक ठोकले होते या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे.
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि हैदराबादसमोर २४६ धावांचे लक्ष्य उभे केले होते. पहिल्या १२ ओव्हरमध्ये अभषेक शर्मा आणि ट्र्व्हिस हेड या दोघांनी सामना एकतर्फी केला आहे.