अफगणिस्तानचा भारतावर विजय (फोटो- ट्विटर)
अफगणिस्तान अ संघाचा भारत अ संघावर विजय
डीएलएस फॉर्मटमुळे अफगणिस्तानचा विजय
ट्राय सिरिजमध्ये भारताचा पहिला पराभव
Tri Series/DLS System: आज ट्राय सिरिजमध्ये भारताचा दूसरा सामना पार पडला. आज भारत आणि अफगणिस्तान आमनेसामने आले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना अफगणिस्तानला 350 रन्सचे टार्गेट दिले होते. वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंहच्या खेळीने भारताने 350 पर्यन्त मजल मारली होती. मात्र अखेर या सामन्यात पावसामुळे अफगणिस्तानचा विजय झाला आहे. 4 रन्सचे अफगणिस्तानने भारतावर विजय मिळवला आहे.
भारताने अफगणिस्तानला 350 रन्सचे टार्गेट दिले होते. अफगणिस्तान फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा काही कालावधीनंतर पाऊस सुरु झाला. मात्र त्यानंतर त्यामुळे ओव्हर्सची संख्या कमी करण्यात आली. या सामन्यात डीएलएस मेथडमुळे अफगणिस्तानने भारतावर 4 रन्सने विजय प्राप्त केला आहे.
अफगणिस्तानची फलंदाजी
अफगणिस्तान कडून इम्रान मीरने सर्वाधिक 84 रन्सची आक्रमक खेळी केली. तर बाहिर शाहने 51 रन्सची अर्धशतकी खेळी केली. मात्र पावसामुळे ओव्हर्स कमी करण्यात आल्या आणि अफगणिस्तानचा विजय झाला आहे. भारताकडून अरशद खान आणि अनुकूल रॉयने प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
IND A Vs AFG A: आया रे तूफान! Vaibhav Sooryavanshi ची आक्रमक खेळी; अफगणिस्तानला 350 रन्सचे टार्गेट
भारताची फलंदाजी
अफगणिस्तानविरुद्ध आज वैभव सूर्यवंशीने लहानशी पण आक्रमक खेळी केली आहे. त्याने 22 बॉलमध्ये 44 रन्सची तुफानी खेळी केली. त्याला प्रभसिमरन सिंहने 84 रन्सची चांगली साथ दिली आहे. वैभव सूर्यवंशी चांगली खेळी करत होता. मात्र त्याच्या खेळीचे तो अर्धशतकी खेळीत रूपांतर करू शकला नाही. मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी 14 रन्सवर आउट झाला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने 44 रन्सची आक्रमक खेळी केली आहे. आज वैभव सूर्यवंशीने अत्यंत संयमी आणि महत्वाची खेळी केली. वैभव आउट झाला तेव्हा भारताने चांगली सुरुवात केली होती. वैभव सूर्यवंशी आउट झाला तेव्हा भारताचा स्कोअर 74 रन्सवर होता. मागील सामन्यात चांगली खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने 66 रन्सची खेळी केली. सुयश शेडगेने 40 रन्सची खेळी केली आहे.
‘Shubhman Gill च्या हातात टीम इंडियाचे भविष्य…’; Michael Clarke चे धक्कादायक विधान
भारत अ संघ: प्रभसिमरन सिंग, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, अनुज रावत, रियान पराग, आयुष बदोनी, रमनदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी, मानव सुथार, ऋतिक शौकीन, राहुल चहर , हर्षित राणा, यश दयाल, वैशाख विजयकुमार.
अफगाणिस्तान अ: झुबैद अकबरी, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, मोहम्मद इसाक, शराफुद्दीन अश्रफ , शाहिदुल्लाह कमाल, करीम जनत, अल्लाह गझनफर, कैस अहमद, फझलहक फारूकी, बिलाल सामी.






