वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष (फोटो- सोशल मीडिया)
उद्या भारत अ विरुद्ध अफगणिस्तान सामना होणार
सकाळी १० वाजता सुरू होणार एकदिवसीय सामना
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष
India A vs Sri Lanka A: सध्या श्रीलंकेत ट्राय सिरिज सुरू आहे. पहिला सामना भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात पार पडला. या चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघावर भारताच्या संघाने दंडणीव विजय मिळवला आहे. ऋतुराज गायकवाडचे शतक आणि तिलक वर्माची खेळी या सामन्यात विजयी ठरली. उद्या भारताचा संघ अफगणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे लक्ष असणार आहे.
श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सिरिजसाठी भारत अ संघ दूसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला आहे. आता भारताची लढाई अफगाणिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध होणार आहे.
दिनांक: ११ जून २०२६ (गुरुवार)
वेळ: भारतीय वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सामना सुरू होईल.
मैदान: रंगिरी दांबुला इंटरनॅशनल स्टेडियम, दांबुला (श्रीलंका).
IND VS SL Live: 278 रन्सचं आव्हान, शेवटची ओव्हर अन्…; श्रीलंकेविरुद्ध भारताने ‘असा’ खेचून आणला विजय
तुम्ही उद्याचा सामना हा सामना घरबसल्या टीव्हीवर आणि मोबाईलवर अगदी सहज लाईव्ह पाहू शकणार आहात. तुम्हाला हा सामना टीव्हीवर पाहायचा असल्यास Sony Sports Network पाहू शकता. मोबाइल किंवा लॅपटॉपवर पाहायचा असेल तर Sony LIV ॲप आणि वेबसाईटवर लाईव्ह पाहू शकणार आहात.
भारत अ संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा ,प्रबसिमरन सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, निहाल वढेरा , आयुष बदोनी, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुतार, हर्षित राणा, यश दयाल , आकाश दीप, वैशाक विजयकुमार.
श्रीलंका अ संघ: लसिथ क्रूशपुल्ले, शेवॉन डॅनियल, नुवानिदु फर्नांडो, पवन रथनायके , सहान अराचिगे, अहान विक्रमसिंघे , मिनोद भानुका, दुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, दिलशान मदुशंका , मथीशा पथिराना.
विकेट किपरच्या बूटने केला Priyansh Arya चा गेम; ऋतुराज अन् प्रियांश एकाच क्रीजमध्ये अन्… ; Video Viral
श्रीलंकेविरुद्ध भारताने ‘असा’ खेचून आणला विजय
ट्राय सिरिजमधील पाहिला सामना भारत अ विरुद्ध श्रीलंका अ या दोन संघांमध्ये पार पडला. एकदिवसीय सामन्यात भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली. तर श्रीलंकेचा कर्णधार सहान अरच्चिगेने 74 रन्सची खेळी केली. भारताने श्रीलंकेला 278 रन्सचे टार्गेट दिले होते. हा सामना चुरशीचा झाला. अखेरच्या ओव्हरपर्यन्त सुरू असलेला हा सामना अखेर भारताने श्रीलंकेवर 8 रन्सने विजय मिळवला आहे.






