सलमान अली आगा आणि लिटन दास(फोटो-सोशल मीडिया)
BAN vs PAK : आशिया कपमध्ये आज २५ सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. आज हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आज जो हा सामाना जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीत पोहचणार आहे, तर पराभूत संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू या सामन्यात प्राणपणाने खेळताना दिसून येणार आहेत.
हेही वाचा : Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…
आशिया कपमध्ये २४ सप्टेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर ४ सामना खेळला गेला. या सामन्यात अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर बांगलादेश १२७ धावाच करू शकला. परिणामी भारताने हा सामना ४१ धावांनी जिंकला. या विजयाने भारताने आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे आज बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात विजेता ठरलेला संघ अंतिम सामन्यात भारताविरुद्ध लढणार आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आजचा सुपर ४ सामना हा सेमीफायनलसारखा असणार आहे. यामागील कारण म्हणजे हा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल, तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे.
आज बांगलादेश आणि पाकिस्तान अमानेसामाने येणार आहे. पाकिस्तानची आकडेवारी बघता आजचा सामना पाकिस्तान जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामागील कारण म्हणजे दोन्ही संघातील रेकॉर्ड आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान पाकिस्तानी संघाने २० सामन्यात बाजी मारली आहे, तर बांगलादेश संघाला फक्त पाच सामनेच जिंकता आले आहेत.
हेही वाचा : आयसीसी महिला विश्वचषकात आफ्रिका अंतिम फेरीत धडक मारेल! कर्णधार वोल्वार्डने व्यक्त केला विश्वास
पाकिस्तान : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
बांगलादेश : सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, झाकीर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.