भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (फोटो- सोशल मीडिया)
पाकिस्तान अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू आहे तीन सामन्यांची सिरिज
3 सामन्यांमध्ये दोन्ही संघ 1-1 बरोबरीत
बाबर आझम पुन्हा ठरला अपयशी
Pakistan Vs Austrelia ODI Series: सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील दोन सामने पूर्ण झाले आहेत. ही सिरिज पाकिस्तानमध्ये सुरू आहे. लाहोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. तर पाकिस्तान पराभूत झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून आता गुरुवारचा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मात्र कर्णधार जोश इंग्लिस आणि कॅमेरून ग्रीन यांनी अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला सावरले. ऑस्ट्रेलियाने 231 रन्सपर्यन्त मजल मारली.
दरम्यान त्यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाथी मैदानात उतरला. पाकिस्तानचा संघ या सामन्यात पराभूत झाला आहे. पाकिस्तानसमोर अधिक मोठे टार्गेट नव्हते. मात्र सुरुवातीपासूनच फलंदाजांनी शरणागती पत्करली. सलामीवीर माज सदाकत शून्यावर बाद झाला, तर साहिबजादा फरहान केवळ 3 रन्स करून तंबूत परतला. सर्वांचे लक्ष बाबर आझमच्या कामगिरीवर होते. मात्र त्याने देखील निराशा केली. तो केवळ 16 रन्स करून आउट झाला. पाकिस्तानचा संघ अधिक लवकर आउट झाला असता.
IND vs AFG: रोहित – हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह, अफगाणिस्ताविरूद्ध खेळणार नाही RO-KO?
मात्र अष्टपैलू शादाब खानने 71 रन्सची महत्वाची खेळी केली. मात्र तो आउट होताच पाकिस्तानच्या आशा संपुष्टात आल्या. तीन सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने बरोबरीत सोडवले आहेत. त्यामुळे पुढील सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. दरम्यान कर्णधार बाबर आझमच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. आगामी सामन्यांमध्ये बाबर आझम कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ: मॅट शॉर्ट, अॅलेक्स कॅरी, जॉश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, कॅमेरून ग्रीन, मॅट रेनशॉ , ऑलिव्हर पीक, नॅथन एलिस, तनवीर सांघा , मॅथ्यू कुहेनमन , अॅडम झॅम्पा, बिली स्टेनलेक.
पाकिस्तानचा संघ: साहिबजादा फरहान, माझ सदाकत, बाबर आझम , अराफात मिन्हास, सलमान अली आगा, मुहम्मद गाझी घोरी , शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार) , हारीस रऊफ, अबरार अहमद , नसीम शाह






