BCCI : सध्या इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या या स्पर्धेत सर्व संघाची पॉवर प्ले मध्ये जाण्यासाठी लढत सुरु आहे. 27 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडिअन्सचा 10 धावांनी पराभव केला. याचदरम्यान मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज ईशान किशनवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. ईशान किशनने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर बीसीसीआयने केली आहे असे सांगण्यात आले आहे आणि त्याच्यावर सामना शुल्काच्या 10 टक्के दंडाची कारवाई झाली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ईशान किशन याने कोणती चूक केली आहे ते स्पष्ट केले नाही. परंतु ईशान किशनने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक केली आहे. त्याचबरोबर त्याने त्याची चूक सुद्धा मान्य केली आहे. लेव्हल 1 च्या चुकीसाठी सामनाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो. आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.2 हे क्रिकेटच्या साधारण कृतींव्यतिरिक्त अतिरिक्त वेगळी कृती, जसे की स्टंपला मारणे किंवा जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे जाहिरातींचे बोर्ड, बाईंड्री लाईन, ड्रेसिंग रुमचे दरवाजे, आरसे, खिडक्या किंवा इतर गोष्टींचे नुकसान करण्याबाबत आहे.