फोटो सौजन्य - PTI सोशल मिडिया
Virat Kohli visited Mahakal in Ujjain : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू व्हायला काही तास शिल्लक आहेत, या सामन्याचे आयोजन 18 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना हा दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ हा सामना जिंकेल त्याच्या हाती मालिका लागणार आहे. शुभमन गिल हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले आहेत.
त्याने शनिवारी सकाळी उज्जैनमधील महाकालचे दर्शन घेतले आणि भस्म आरतीत भाग घेतला. टीम इंडिया सध्या इंदूरमध्ये आहे, जिथे रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि निर्णायक सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी कोहलीने महाकालचे दर्शन घेतले. कोहलीच्या आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल यांनीही शुक्रवारी महाकाल मंदिराचे दर्शन घेतले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
विराट कोहली नंदीच्या मूर्तीजवळ शांत बसलेला दिसला. तो बराच निश्चिंत दिसत होता. कोहलीने यापूर्वीही अनेकदा मंदिराला भेट दिली आहे. त्याने त्याची पत्नी अनुष्कासोबत महाकालचेही दर्शन घेतले आहे. यावेळी कोहली एकटाच आला होता. या मंदिरातील भस्म आरती खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकजण त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. कोहलीनेही असेच केले. अलिकडेच, कोहली आध्यात्मिकदृष्ट्या खूप प्रवृत्त असल्याचे दिसून आले आहे. तो आणि त्याची पत्नी अनुष्का देखील अनेक वेळा प्रेमानंद महाराजांना भेट देतात.
#WATCH | Madhya Pradesh | Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli offered prayers at Shree Mahakaleshwar Temple in Ujjain. He says, “Jai shree Mahakal…” pic.twitter.com/2UzpgcvFZn — ANI (@ANI) January 17, 2026
कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ९३ धावा केल्या. त्याने त्याच्या शेवटच्या सहा एकदिवसीय सामन्यांपैकी पाच डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, दोनदा शतके झळकावली आहेत. इंदूरमध्ये खेळला जाणारा तिसरा एकदिवसीय सामना हा निर्णायक सामना आहे आणि टीम इंडियासाठी हे महत्त्वाचे आहे की कोहलीची बॅट चांगली कामगिरी करेल आणि भारताने केवळ सामनाच नाही तर मालिकाही जिंकली पाहिजे.
विराट कोहलीने टी20 क्रिकेट त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे. तो आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. त्याचबरोबर तो आता न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे त्यानंतर तो आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळताना दिसणार आहे.






