फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज आहे पण अजुनपर्यत बीसीसीआयने या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. भारताचा कोणत्या खेळाडूंना संघामध्ये सामील केले जाणार यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. यावेळी आशिया कप 2025 ची ही स्पर्धा टी20 फाॅरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीनंतर, बीसीसीआय आता देशांतर्गत हंगाम सुरू करत आहे. जिथे पहिली स्पर्धा दुलीप ट्रॉफी असेल. जिथे ६ संघ खेळणार आहेत. या देशांतर्गत स्पर्धेत अनेक मोठे चेहरे दिसणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर, टीम इंडिया २०२५ मध्ये आशिया कप खेळणार आहे. या स्पर्धेपूर्वी, स्टार विकेटकीपर फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर होता. निवडकर्त्यांनी आता त्याच्या जागी खेळाडूची घोषणा देखील केली आहे. २०२५ च्या दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा संघ जाहीर झाला तेव्हा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला कर्णधारपद देण्यात आले. दुखापतीमुळे किशन इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. त्यानंतरही निवडकर्त्यांना आशा होती की किशन तंदुरुस्त झाल्यानंतर दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल.
Odisha’s wicketkeeper-batter Aashirwad Swain has been selected for the East Zone squad in the Duleep Trophy, replacing Ishan Kishan! 🏏🔥
He joins Sandeep Pattnaik in the squad, while Swastik Samal has been named as standby. 👏✨#odishacricketassociation #duleeptrophy #eastzone… pic.twitter.com/tgffJry9PU— Odisha Cricket Association (@cricket_odisha) August 17, 2025
तथापि, असे होऊ शकले नाही, किशनला अनफिट असल्याने दुलीप ट्रॉफीमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्या जागी आता आशीर्वाद स्वेनला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच वेळी, अभिमन्यू ईश्वरनला आता कर्णधारपद दिले जाऊ शकते. यासोबतच, इशान किशनही आशिया कप २०२५ साठी निवडीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. वृत्तानुसार, या स्पर्धेसाठी संघाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. फिट नसल्याने, किशनच्या नावाची सध्या चर्चा नाही.
हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
तथापि, टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी किशनला लवकरच मैदानात उतरावे लागेल. त्याच वेळी, स्वस्तिक सामलला स्टँडबाय म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. दुलीप ट्रॉफी २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. रविवारी पूर्व विभागाचा कर्णधार इशान किशन दुलीप ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडला. २७ वर्षीय विकेटकीपर-फलंदाजाला नुकतेच पूर्व विभागाचा कर्णधार बनवण्यात आले. आता तो २८ ऑगस्टपासून बेंगळुरू येथे सुरू होणाऱ्या सहा संघांच्या स्पर्धेत खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत, २० वर्षीय ओडिशाचा विकेटकीपर आशीर्वाद स्वेनला इशानच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली.
ओडिशा क्रिकेट असोसिएशनने X वर लिहिले की, ओडिशाचा यष्टीरक्षक-फलंदाज आशीर्वाद स्वेनची दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागीय संघात निवड झाली आहे, तो इशान किशनच्या जागी आहे. तो संदीप पटनायकसह संघात सामील होईल, तर स्वस्तिक सामलला स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.