फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयपीएल २०२५ : आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएल २०२५ मध्ये खेळाडू रिटेन्शनचे नियम आज ठरवले जाणार आहेत, त्यासाठी बंगळुरूमध्ये आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अधिकाऱ्यांची आज बंगळुरूमध्ये चर्चा होणार आहे. बैठकीनंतर नवीन नियम जाहीर होऊ शकतात आणि त्या नियमानुसार संघ खेळाडू रिटेन करणार आहेत. रिटेन्शन नियमांसोबतच आयपीएल लिलावाची तारीखही या बैठकीमध्ये ठरवली जाऊ शकते. वृत्तानुसार असे सांगितले जात आहे की, BCCI संघांना ५ किंवा ६ खेळाडूंसाठी रिटेन्शन पर्याय दिला जाऊ शकतो.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्याच्या वृत्तामध्ये असे सांगितले आहे की, आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची शनिवारी बंगळुरूमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएलचे नवीन रिटेनशन नियम जाहीर केले जाणार आहे, त्याचबरोबर आयपीएल २०२५ च्या संदर्भात इतर बाबींवर देखील आज चर्चा होऊ शकते. आयपीएल २०२५ मध्ये अनेक नियमांमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत मेगा लिलावाच्या तारखेवरही चर्चा होऊ शकते. बीसीसीआयने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल संघांचीही भेट घेतली होती त्यावेळी अनेक नवीन नियमांवर चर्चा झाली होती.
🚨IPL RETENTION ANNOUNCEMENT IN 24 HOURS…!!! 🚨
– IPL GC to meet today in Bengaluru to finalise retention rules. (Cricbuzz). pic.twitter.com/H52kpj1iIy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024
आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये कोणते संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार यावर क्रिकेट प्रेमींच लक्ष्य असणार आहे. मेगा ऑक्शन कुठे होणार? किती तारखेला आयोजित केले जाणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. अनेक संघामध्ये नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना संघाचा घ्यायचा प्लॅन आहे यावर लक्ष असणार आहे.