फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
पद्माकर शिवलकर यांचे निधन : मुंबईचे दिग्गज फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी वयाशी संबंधित समस्यांमुळे निधन झाले. पद्माकर शिवलकर हे ८४ वर्षांचे होते. भारतासाठी कधीही न खेळलेल्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या शिवलकर यांनी १९६१-६२ ते १९८७-८८ दरम्यान एकूण १२४ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि १९.६९ च्या सरासरीने ५८९ विकेट्स घेतल्या. याशिवाय, त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे, ६०० हून अधिक विकेट्स घेतल्यानंतरही त्याला भारतीय संघात संधी मिळू शकली नाही. यावर सुनील गावस्कर म्हणाले आहेत की शिवलकर इतर काही खेळाडूंपेक्षा भारताकडून खेळण्यास अधिक पात्र होता असे सांगितले आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज याने वयाच्या २२ व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आणि वयाच्या ४८ व्या वर्षापर्यंत त्यांनी क्रिकेट खेळले आहे. त्याने भारताच्या प्रमुख स्थानिक स्पर्धेत ५८९ विकेट्स घेतल्या, ज्यात १३ वेळा १० विकेट्स घेतल्या होत्या. शिवलकरने १२ लिस्ट ए सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांना सीके नायडू ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “मुंबई क्रिकेटने आज एक खरा दिग्गज गमावला आहे. पद्माकर शिवलकर सरांचे खेळातील योगदान, विशेषतः सर्वकालीन सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक म्हणून, नेहमीच लक्षात ठेवले जाईल.”
दरम्यान, दिग्गज सुनील गावस्कर यांनी सोमवारी मुंबई आणि स्थानिक क्रिकेटमधील दिग्गज पद्माकर शिवलकर यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली आणि म्हटले की, ‘काही जण इतरांपेक्षा भारतीय संघात खेळण्यास अधिक पात्र होते’. शिवलकर हे देशातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक होते ज्यांना कधीही राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. शिवलकर यांच्या निधनाबद्दल गावस्कर यांनी भावनिक संदेश लिहिला आणि म्हटले की, “ही खरोखरच खूप दुःखद बातमी आहे. अल्पावधीतच, मुंबई क्रिकेटने त्यांचे दोन दिग्गज खेळाडू, मिलिंद आणि पद्माकर यांना गमावले आहे. हे दोघे अनेक विजयांचे शिल्पकार होते.
In my book Padmakar Shivalkar is unarguably Mumbai’s biggest matchwinner and possibly the unluckiest cricketer never having got a chance to play for India pic.twitter.com/9w56zSvWGU
— Cricketwallah (@cricketwallah) January 19, 2025
सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, “भारतीय कर्णधार म्हणून, मला वाईट वाटते की मी राष्ट्रीय निवडकर्त्यांना कसोटी संघात ‘पॅडी’चा समावेश करण्यास पटवून देऊ शकलो नाही. तो इतर काही गोलंदाजांपेक्षा भारतीय संघात असण्यास अधिक पात्र होता. तुम्ही याला नशीब म्हणू शकता, तो असा गोलंदाज होता जो विरोधी संघाच्या सर्वोत्तम फलंदाजांना बाद करून मुंबईचा विजय निश्चित करायचा. त्याच्या किफायतशीर धावपळीमुळे आणि आकर्षक अॅक्शनमुळे तो दिवसभर गोलंदाजी करू शकत होता. ‘पॅडी’ ही एक अद्वितीय व्यक्ती होती आणि त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. ओम शांती.