आश्चर्य! BCCI ने ज्या गोष्टीवर बंदी घातली; त्याचीच गौतम गंभीर करताहेत जाहिरात, नेटकऱ्यांनी घेतले तोंडसुख
Gautam Gambhir on Chhava Movie : छावा सिनेमाची क्रेझ भारताबाहेरही जबरदस्त आहे. छावा सिनेमा पाहून बरेच जणं भावूक झाल्याचे आपण पाहिले आहेत. भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीरही या गोष्टीला अपवाद नाहीत. कारण छावा सिनेमा पाहिल्यावर गंभीर यांनी एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य आता गंभीर यांच्या चांगलंच अंगलट येत असल्याचे दिसत आहे. कारण छावा सिनेमावर वक्तव्य केल्यावर चाहत्यांनी गंभीरला ट्रोल करत त्याच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाला गौतम गंभीर वाचा
𝐂𝐡𝐚𝐭𝐫𝐚𝐩𝐚𝐭𝐢 𝐒𝐚𝐦𝐛𝐡𝐚𝐣𝐢 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐣
Devotion to Motherland!— Gautam Gambhir (@GautamGambhir) February 18, 2025
गौतम गंभीरने ‘छावा’बाबत काय वक्तव्य केलं होतं..
गौतम गंभीर हे सध्या दुबईत आहे. गंभीर यांंनी दुबईमध्ये गेल्यावर छावा सिनेमा पाहिला आणि त्यावर त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट भली मोठी नव्हती. गंभीर यांनी यावेळी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘छत्रपती संभाजी महाराज… मातृभूमीसाठी समर्पण…’. गंभीर यांनी फक्त दोन शब्दांत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपली भावना व्यक्त केली होती. त्यानंतर चाहते आता गंभीर यांना ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गौतम गंभीरला नेटकऱ्यांनी झापले
Bhai Champions trophy mat harwa dena
— Satyam Subhaprakash (@satythinks) February 18, 2025
एका चाहत्याने म्हटले आहे की, ” तू सिनेमा काय बघतोस, भारतीय संघाला कोचिंग दे… “
गंभीरला ट्रोल करताना अजून एका चाहत्याने म्हटले आहे की, ” तु चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला हरवू नकोस… ”
गौतम गंभीर ट्रोल का होतोय…
गौतम गंभीर संघात आल्यापासून भारताची कामगिरी लौकिकाला साजेशी होताना दिसत नाही. भारतीय संघ टी २० सामने जिंकत आहेत. पण कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे चाहते गंभीर यांच्यावर नाराज आहेत. गंभीर यांनी केलेली पोस्ट काही वाईट नव्हती. पण त्यांच्यावर चाहते एवढे भडकले आहेत की, ते त्यांना ट्रोल करत आहेत.