महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा मेंटोर असणार? (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Mohammad Yousuf On IND vs PAK Match : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी, भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपली मोहीम सुरू करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, क्रिकेट दिग्गज सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. आता, पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर आपले मत व्यक्त केले आहे. खरं तर, भारतीय फलंदाजांव्यतिरिक्त, गोलंदाजही उत्तम फॉर्ममध्ये आहेत. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचे मानले जाते, परंतु मोहम्मद युसूफ यांचे मत वेगळे आहे.
‘न्यूझीलंडचा संघ सर्वात संतुलित….’
दुबईमध्ये खेळण्याचा फायदा पाकिस्तानला होणारआ आहे, त्यामुळे पाकिस्तानला भारतावर बाजी मारण्याची शक्यता आहे, असे मोहम्मद युसूफचे मत आहे. खरंतर, पाकिस्तान संघ दुबईमध्ये सतत खेळत आहे, ज्याचा त्यांना भारताविरुद्ध फायदा होऊ शकतो. मोहम्मद युसूफ यांनी सामा टीव्हीवर सांगितले की, न्यूझीलंडचा संघ सर्वात संतुलित दिसतो. या परिस्थितीचा विचार करता, न्यूझीलंडकडे चांगले खेळाडू आहेत. मिचेल सँटनरकडे ३ उत्कृष्ट वेगवान गोलंदाज तसेच चांगले फिरकी गोलंदाज आहेत. याशिवाय, न्यूझीलंडचा टॉप-६ उत्कृष्ट आहे. या सर्वांव्यतिरिक्त, किवी संघाचा यष्टीरक्षक हा एक अष्टपैलू खेळाडू आहे.
‘आम्ही अलिकडच्या काळात फिरकी अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळलो आहोत…’
मोहम्मद युसूफ म्हणाले की, भारतीय संघही चांगला आहे, पण मला वाटते की पाकिस्तानला दुबईमध्ये खेळण्याचा फायदा मिळेल. याशिवाय, पाकिस्तान आपले सामने घरच्या मैदानावर खेळेल, परंतु पाकिस्तानला चांगले क्रिकेट खेळावे लागेल. मोहम्मद युसूफ पुढे म्हणतात की, आम्ही अलिकडच्या काळात फिरकी अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळलो आहोत. आमच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्याचा मार्ग शोधावा लागेल. तसेच, स्ट्राइक फिरवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि शक्य तितके कमी डॉट बॉल खेळावे लागतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघ-
मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी