फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये काल सामना झाला या सामन्यांमध्ये टीम इंडियाने किवी संघाचा ४४ धावानी पराभव केला आणि संघाने उपांत्य फेरी अपराजित संघ म्हणून गाठली आहे. आता भारताचा संघ ४ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलचा पहिला सामना खेळणार आहे. तर दुसरा सेमीफायनलचा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. याआधी आता भारतीय संघाचा सदस्यांच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे त्याला संघ सोडून भारतामध्ये यावे लागले आहे. टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडूच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भारतीय संघाचे व्यवस्थापक आर. देवराज यांच्या आईचे निधन भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी झाल्यामुळे त्यांना लगेचच दुबई सोडून मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे त्यांना चॅम्पियन ट्रॉफीची ही स्पर्धा मध्यातच सोडावी लागली आहे. रविवारी म्हणजेच २ मार्च रोजी त्यांच्या आईच्या निधनाची बातमी त्यांना समजली आणि ते लगेच हैदराबादला पोहोचले. भारतीय संघ दुबईमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे सामने खेळत आहे, अशावेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून आर. देवराज हे टीमसोबत होते त्यानंतर ते लगेच बातमी कळताच भारताचा आले. भारतीय संघाचे व्यवस्थापक आर. देवराज यांच्या आईच्या मृत्यूबाबत हैदराबाद क्रिकेट असोशिएशनने माहिती दिली आहे.
कालच्या सामन्यांमध्ये रोहित शर्माचा आणखी एकदा नाणेफेकमध्ये पराभव झाला. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने सुरुवात चांगली केली. हार्दिक पंड्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने रचिन रवींद्रला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. १२ चेंडूत ६ धावा करून रचिन बाद झाला. १२ व्या षटकात वरुण चक्रवर्तीने विल यंगला (३५ चेंडूत २२) बाद केले. १४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर रवींद्र जडेजाने टॉम लॅथमला एलबीडब्ल्यू बाद केले. ग्लेन फिलिप्स ८ चेंडूत १२ धावा काढून बाद झाला आणि मायकेल ब्रेसवेल २ धावा काढून बाद झाला. १२० चेंडूत ८१ धावा काढल्यानंतर केन विल्यमसन अक्षरचा बळी ठरला. कर्णधार मिचेल सँटनर ३१ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. वरुण चक्रवर्तीने मॅट हेन्रीला बाद करून आपला पाच विकेट्स पूर्ण केला. कुलदीपने विल्यम्सला क्लीन बॉलिंग करून भारताचा विजय निश्चित केला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने तीन विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ६ षटकांच्या आत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. शुभमन गिल सात चेंडूत दोन धावा काढून बाद झाला आणि रोहित शर्मा १७ चेंडूत १५ धावा काढून बाद झाला. आपला ३०० वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आलेल्या विराट कोहलीला १४ चेंडूत फक्त ११ धावा करता आल्या. ग्लेन फिलिप्सने एक शानदार झेल घेतला. श्रेयसने अक्षर पटेलसोबत चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. अक्षर ६१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर ९८ चेंडूत ७९ धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुलही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि २३ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने २० चेंडूत १६ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्याने ४५ चेंडूत ४५ धावांची दमदार खेळी केली. मोहम्मद शमी ५ धावा काढून बाद झाला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने पाच विकेट्स घेतल्या.