न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दुबई : दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या साखळी फेरीतील शेवटचा सामाना भारताने आपल्या नावे केला. भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या साखळी सामन्यात आपला दबदबा कायम राखत भारताने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. न्यूझीलंडला 205 धावांवपर्यंत मजल मारता आली. केन विल्यम्सनची एकाकी झुंज अपयशी ठरली. श्रेयस अय्यर, वरुण चक्रवर्ती हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. श्रेयसने 79 धावा करत भारताला 250 पर्यंत पोहचवले तर वरुणने आपल्या फिरकीच्या जोरावर अर्धा न्यूझीलंड संघ गारद केला. त्याने 42 धावांच्या बदल्यात 5 फलंदाज बाद केले. आता दुबईत 4 मार्चला भारत सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत भिडणार आहे.
हेही वाचा : IND vs NZ : 300 व्या वनडेमध्ये ‘किंग कोहली’ फेल; ग्लेन फिलिप्सचा हवेत सुर मारत अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल केवळ 2 बाद झाला आहे. त्याला मॅट हेनरीने माघारी पाठवले. त्यापाठोपाठ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा देखील आज फार काळ टिकू शकला नाही. तो 17 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. विराट कोहलीही आज अपयशी ठरला. 300 व्या एकदिवसीय सामन्यात कोहली धावा करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, ग्लेन फिलिप्सने किंग कोहलीचा अप्रतिम झेल पकडला आणि कोहलीला 11 धावांवरच तंबूत परत जावं लागलं.
त्यांतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेल 42 धावांवर असताना रचीन रवींद्रच्या गोलंदाजीवर यंगकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने 98 चेंडूमध्ये 79 धावा केल्या. के एल राहुलनेही फार काही कमाल केली नाही. तो 23 धावा करून तंबूत परतला.
रवींद्र जडेजा 16 धावांवर असताना मॅट हेनरीचा शिकार ठरला. हार्दीक पांड्याने जोरदार फटके बाजी करत संघाला संघाला 250 पर्यंत पोहचवलं. त्याने 45 चेंडूमध्ये 45 धावा केल्या. त्यांतर आलेल्या शमीने 5 धावा करून तंबूचा रस्ता पकडला. तर कुलदीप यादव 1 धाव करून नाबाद राहीला. न्यूझीलंडकडून मॅट हेनरीने चमक दाखवत भारताच्या 5 खेळाडूंना माघारी पाठवले. जेमिसन, विल्यम ओ’रुर्क, मिचेल सँटनर आणि रचीन रवींद्र यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला 250 पर्यंत रोखून तो निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले खरे मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हरकिरी करत सामाना गमवावा लागला. न्यूझीलंडने या सामन्यात सर्व बाद 205 धावा केल्या. या सामन्यात केवळ केन विल्यमसनने एकट्याने झुंज दिली. त्याने 120 चेंडूमध्ये 81 धावांची खेळी केली. परंतु तों संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लामीवीर यंग 22 धावा करून बाद झाला. त्यांतर आलेल्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून वरुण चक्रवर्तीने 5 विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवने 2 विकेट्स काढल्या. हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स मिळवली.
भारतीय संघाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा
न्यूझीलंड संघाची प्लेइंग 11
विल यंग, डेरेल मिचेल, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओ’रोर्क