MI Vs CSK Toss Live (फोटो- ians)
ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंड्या आमनेसामने
रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे लक्ष
दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक
Tata IPL 2026 MI Vs CSK Live: आज आयपीएलमध्ये मोठा सामना पाहायला मिळणार आहे. रोमांचक सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे. थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड आणि मुंबईचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे चेपॉक स्टेडियमवर सामना होत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सातव्या तर मुंबई इंडियन्स नवव्या स्थानी आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजची स्थिती दोघांसाठी करो या मरो अशी असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोमांच पाहायला मिळणार आहे.
MI Vs CSK Live: आज चेपॉक ढवळून निघणार; ‘किंग्ज विरुद्ध पलटण’, मुंबई बदला घेणार?
चेपॉक स्टेडियम खेळपट्टी रिपोर्ट
चेन्नईचे चेपॉक मैदान हे परंपरेने फिरकीपटूंसाठी नंदनवन मानले जाते. मात्र यंदा या हंगामात खेळपट्टी वेगळ्या स्वरूपाची दिसून आली आहे. आता ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त दिसून आली आहे. खेळपट्टी सपाट असल्याने चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येत आहे, ज्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जात आहे. रात्रीच्या वेळी मैदानात दव पडण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे आणि चेंडूवर पकड मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून कोणत्याही संघाचा कर्णधार गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
चेन्नई आणि मुंबई यांच्यातील आमनेसामनेचा विक्रम
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 40 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 21 MI ने जिंकले आहेत, तर CSK ने 19 जिंकले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन (ऑलराउंडर),अकील होसेन, नूर अहमद, अंशुुल कंबोज, गुरजपनीत सिंग, एम. एस. धोनी , आयुष म्हात्रे, उर्विल पटेल.
भाई का स्वॅग है! KL राहुलने मोडल ‘Rohit- Kohli ‘चा ‘हा’ रेकॉर्ड; आयपीएलचा नवा बॉस
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), रायन रिकलटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, मिचेल सँटनर, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह , अश्वनी कुमार, दानिश मालेवार.






