MI Vs CSK Live Streaming (फोटो- ट्विटर)
हार्दिक पंड्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्वाचा सामना
नमन धीरने केले शानदार अर्धशतक
Tata IPL 2026 MI Vs CSK Live Updates: सध्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरू आहे. दरम्यान हार्दिक पंड्याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचा असणार आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 159 रन्स केल्या. आता चेन्नई सुपर किंग्जला पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी 160 रन्सची गरज असणार आहे.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबई पलटणच्या डावाची सुरूवात केली. मात्र विल जॅक्सने आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. 5 बॉलमध्ये केवळ 1 रन करून तो आउट झाला. त्यापाठोपाठ रियान रिकल्टने 37 रन्सची खेळी केली.
नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. सूर्यकुमार यादव 21 रन्स करून आउट झाला. तर तिलक वर्माने 8 बॉलमध्ये 5 रन्स केल्या. तिलक वर्माने आज साजेशी खेळी केली नाही. रॉबिन मिन्झने येताच पहिल्या बॉलवर फोर मारला. मात्र तो 5 रन्स करून आउट झाला.
Dealing strictly in boundaries 🔥 A blazing 24-ball 5️⃣0️⃣-run partnership between Ryan Rickelton & Naman Dhir 🤝 Updates ▶️ https://t.co/VVAjldiiC0#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/5neLsPHAWe — IndianPremierLeague (@IPL) May 2, 2026
चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सला दोन धक्के दिले. अंशूल कंबोजने विल जॅक्सची विकेट घेतली. तर नूर अहमदने तिलक वर्मा आणि रियान रिकल्टनची विकेट घेतली. त्यापाठोपाठ रामकृष्णा घोष या नवख्या गोलंदाजाने सूर्यकुमार यादवची विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन (ऑलराउंडर),अकील होसेन, नूर अहमद, अंशुुल कंबोज, गुरजपनीत सिंग, एम. एस. धोनी , आयुष म्हात्रे, उर्विल पटेल.
भाई का स्वॅग है! KL राहुलने मोडल ‘Rohit- Kohli ‘चा ‘हा’ रेकॉर्ड; आयपीएलचा नवा बॉस
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), रायन रिकलटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, मिचेल सँटनर, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह , अश्वनी कुमार, दानिश मालेवार.






