फोटो सौजन्य - IndianPremierLeague
केएलचे शतक : दिल्ली विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सध्या सामना सुरू आहे या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातच्या संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे तरच त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहणार आहेत. अशा वेळी संघासाठी शतक ठोकणे आणि संघाला संकटातून बाहेर काढले आहे. दिल्लीच्या संघासाठी आजच्या सामन्यात केएल राहुलने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात केल राहुल हा सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरला होता. खराब फॉर्म नंतर त्याने आज पुन्हा एकदा अविश्वासनीय कामगिरी केली आहे.
आजच्या सामन्यामध्ये केएल राहुलने संघासाठी कठीण काळामध्ये शतक झळकावले आहे. त्याने 60 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या. या महत्त्वाच्या धावा दिल्ली कॅपिटल्ससाठी नक्कीच कमी येतील. आजच्या या राहुलच्या खेळीने संघासाठी कमालीचा खेळ दाखवला आहे. त्याने आजच्या सामन्यात १०२ धावा केल्या यामध्ये त्याने ४ षटकार आणि १४ चौकार ठोकले आहेत.
💯 reasons why KL Rahul is a big match player 🫡
His majestic ton keeps the momentum running for #DC 💪
Updates ▶ https://t.co/4flJtatmxc #TATAIPL | #DCvGT | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/VnbvyTZ2Dw
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. फाफ डू प्लेसिसला अर्शद खानने फक्त ५ धावांवर बाद केले. यानंतर, सलामीवीर म्हणून मैदानावर आलेल्या केएल राहुलने जबाबदारी स्वीकारली आणि अभिषेक पोरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. राहुलने शानदार फलंदाजी केली आणि या हंगामातील त्याचे चौथे अर्धशतक ३५ चेंडूत पूर्ण केले. या खेळीदरम्यान राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.
राहुल वेगवान क्रिकेटमध्ये ८ हजार धावा करणारा तिसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत किंग कोहलीला मागे टाकले आहे. राहुलने २२४ व्या डावात ही कामगिरी केली. त्याच वेळी, २४३ व्या सामन्यात कोहलीच्या नावावर ही कामगिरी जोडली गेली. राहुलने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानलाही मागे टाकले आहे. रिझवानने त्याच्या २४४ व्या डावात ही कामगिरी केली.