पॅट कमिन्स आणि अक्षर पटेल(फोटो-सोशल मीडिया)
DC vs SRH: आयपीएल 2025 मध्ये आज (30 मार्च) रोजी क्रिकेट चाहत्यांना डबल धमाका बघायला मिळणार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथे रंगणार आहे, तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोणता संघ बाजी मारणार? याबद्दल माहिती घेऊया.
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 मधील 18 व्या हंगामात लखनौ जायंट्स विरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे, दिल्ली आज या हंगामातील आपला दुसरा सामना खेळणार असून विजय मिळवण्यास प्रयत्नशील असणार आहे. तर, हैदराबादने राजस्थानविरुद्धचा आपला पहिला विजय मिळवला असून लखनऊविरुद्धचा दुसरा सामना मात्र गमावला आहे. अशा स्थितीत आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली असा तिसरा सामना रंगणार आहे.
हेही वाचा : GT vs MI : आशिष नेहरा रागाने लालबुंद? दोन हात पुढे करून केली गर्जना..! नेमकं काय घडलं? पहा VIDEO
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघामध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद हा संघ वरचढ ठरलेला दिसून येतो. IPL च्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये एकूण 24 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी सनरायझर्स हैदराबादने 13 सामने आपल्या नाव केले आहेत तर दिल्ली 11 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. गेल्या मोसमात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना झाला होता, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद 67 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या मागील 5 सामन्यांमध्ये दिल्लीकॅपिटल्स संघाची कामगिरी थोडी चांगली राहिलेली दिसून येते. या 5 सामन्यांपैकी दिल्ली कॅपिटल्सने 3 वेळा विजय प्राप्त केला आहे, तर सनरायझर्स हैदराबादने 2 सामने आपल्या नावे केले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा : MI vs GT : MI vs GT : चल जा..! Hardik Pandya आणि साई किशोर यांच्यात नजरेला नजर : आग ओकणारे ते 10 सेकंद अन्..,पहा Video
दिल्ली कॅपिटल्स संघ
अक्षर पटेल (कर्णधार), जेक-फ्रेजर मॅकगर्क, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, विपराज निगम, अजय कुमार मंडल, मदवन कुमार, त्रिपुरुष मंडल, मनमोहन सिंह. मिचेल स्टार्क, टी नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव.
सनरायझर्स हैदराबाद संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन, , अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, झीशान अन्सारी, सिमरजीत सिंग, जयदेव उनाडकट, बॉयडेन मेनसेन, बॉयडेन कार्मिक, का माल्डिंग, ए. सचिन बेबी.