मोहम्मद सिराज (फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : आयसीसीने ताजी टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठी झेप घेतली आहे. मोहम्मद सिराज आता कसोटीतील गोलंदाजांच्या यादीमध्ये १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल कसोटमधेय केलेल्या शानदार कामगिरीनंतर, सिराजने १२ स्थानांची मोठी झेप घेतली आहे. यासह सिराजनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान गाठले आहे.
हेही वाचा : IND vs ENG : ‘देशासाठी वेदना आणि अस्वस्थता विसरा’ : भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनील गावसकर यांचे परखड मत
सिराज ओव्हल कसोटी सामन्यातील भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता. या सामन्यात त्याने दोन्ही डावात एकूण ९ विकेट्स घेतल्या. सिराजने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. सिराजच्या या कामगिरीने भारत इंग्लंडला ६ धावांनी पराभूत करू शकला आणि मालिकेत २-२ अशी बरोबरी साधू शकला.
मोहम्मद सिराज यापूर्वी आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत १६ व्या स्थानावर पोहोचला होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्याने ही किमया साधली होती. आता त्याने १५ वे स्थान गाठले आहे. भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ८८९ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमराह तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीत केवळ ३ सामने खेळले होते.
प्रसिद्ध कृष्णाने देखील कारकिर्दीतील सर्वोत्तम ५९ वे स्थान गाठले आहे. प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही डावात प्रत्येकी चार बळी घेऊन महत्वाची भूमिका बजावली. तो कृष्णा सिराजसह दोन्ही डावात चार किंवा त्याहून अधिक बळी घेणारी दुसरी भारतीय गोलंदाज जोडी बनली आहे. यापूर्वी १९६९ मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी आणि एरापल्ली प्रसन्ना यांनी हा पराक्रम केला होता.
ओव्हल कसोटी सामन्यात मालिकेतील दुसरे शतक झळकावल्यानंतर, भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-५ मध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. जयस्वालने तीन स्थानांनी प्रगती साधत आता ७९२ गुणांची कमाई केली आहे. तर टॉप १० मध्ये असलेला एकमेव भारतीय फलंदाज ऋषभ पंत आहे, जो पायाच्या दुखापतीमुळे पाचवी कसोटी खेळू न शकल्याने आठव्या स्थानावर घसरला आहे.
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने मालिकेतील सलग तिसऱ्या शतकासह अव्वल स्थान अधिक बळकट केले आहे. तर हॅरी ब्रूकच्या ९८ चेंडूत १११ धावांच्या खेळीच्या जोरावर तो दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. गोलंदाजीत, इंग्लंडचे वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन आणि जोश टँग यांनी सामन्यात प्रत्येकी आठ विकेट घेत त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी मिळवली आहे. अॅटकिन्सनने पहिल्यांदाच टॉप १० एंट्री केली आहे तर टँग १४ स्थानांनी वर चढून ४६ व्या स्थानावर आला आहे.