फोटो सौजन्य - Gujarat Titans सोशल मीडिया
Rajasthan Royals vs Gujarat Titans 1st innings report : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये दुसऱ्यांदा आयपीएल २०२५ मध्ये लढत सुरु आहे. गुजरातच्या संघाने या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानचे गोलंदाज आजच्या सामन्यात विशेष कामगिरी करू शकले नाही. राजस्थानच्या हाती फक्त २ विकेट आजच्या सामन्यात लागले. गुजरातच्या संघाने पहिले फलंदाजी करत राजस्थान रॉयल्स समोर 210 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात आणखी एकदा संघाचा कर्णधार शुभमन गिलने प्रभावशाली खेळी खेळली.
गुजरातच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर साई सुदर्शन या दोघांनी संघाला आणखी एकदा दमदार सुरुवात करून दिली. साई सुदर्शन आज मोठी खेळी खेळू शकला नाही, पण त्याने आज संघासाठी ३० चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या यामध्ये त्याने संघासाठी १ षटकार ३ चौकार मारले. आजच्या सामन्यात आणखी एकदा जोस बटलर याने कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने आणखी एकदा गुजरात टाइटांसाठी अर्धशतक झळकवले. जोस बटलरने संघासाठी २६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या यामध्ये त्याने ४ षटकार आणि ३ चौकार मारले. शाहरुख खान २० व्या ओव्हरमध्ये फलंदाजीला आला होता त्याने संघासाठी २ चेंडूंमध्ये ५ धावा केल्या.
Innings Break!
Another 🔝 performance with the bat sees #GT put 2⃣0⃣9⃣ on the board!
Will #RR chase it down in front of their home crowd? 🤔
Updates ▶ https://t.co/HvqSuGhrbl#TATAIPL | #RRvGT | @gujarat_titans pic.twitter.com/GiIRj4Iv0e
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
शुभमन गिल याने संघासाठी दमदार खेळी खेळली. आजच्या सामन्यात त्याने कमालीचा खेळ दाखवला. ५० चेंडूंमध्ये त्याने ८४ धावा केल्या यामध्ये त्याने ४ षटकार आणि ५ चौकार मारले. वॉशिंग्टन सुंदर आज फलंदाजीला आला होता पण तो मोठी खेळी खेळू शकला नाही त्याने आज संघासाठी ८ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या आणि संदीप शर्माने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. राहुल तेवतीया १८ व्या ओव्हरमध्ये फलंदाजीला आला होता त्याने षटकार मारला आणि त्यानंतर पुढील चेंडूवर जोफ्रा आर्चरने त्याला बाद केले.
आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाला फक्त ४ विकेट हाती लागले होते. यामध्ये महिष तिक्षणा याने संघासाठी २ विकेटची कमाई केली. यामध्ये त्याने पहिले त्याने साई सुदर्शनला बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर त्याने शुभमन गिलला बाद केले. संदीप शर्माच्या हाती १ विकेट लागली त्याने वॉशिंग्टन सुंदर याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोफ्रा आर्चर याने संघासाठी १ विकेट घेतला, त्याने राहुल तेवतीया याला आऊट केले.
राजस्थानच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर संघाला आज जलद गतीने धावा करणे गरजेचे आहे त्याचबरोबर संघाने विकेट न गमावलास संघ विजयाच्या दिशेने जाईल. यशस्वी जैस्वाल सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे पण त्याला संघाची साथ मिळाली नाही. त्याचबरोबर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील संघाला सुरुवात करून देत आहे पण त्याने मोठी खेळी खेळली नाही. रियान पराग, नितीश राणा, हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा आहे पण या खेळाडूंनी संघाला निराश केले आहे.