फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Hardik Pandya’s struggles in the last two years : मागील दोन वर्षांमध्ये हार्दिक पांड्याचे आयुष्य हे फार रोलरकोस्टर राहिले आहे. काही दीड – एक वर्षांपूर्वी हार्दिक पांड्या बरोबर काय घडले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तो कुठल्या संघर्षातून जात होता त्याच्यासोबत क्रिकेट चाहत्यांनी कशाप्रकारची वागणूक केली हे सर्वानाच ठाऊक आहे. 2024 मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये ते चॅम्पियन ट्रॉफीच्या प्रवासापर्यत आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली. भारताची कॅप्टनशीप गेली, वैयक्तिक आयुष्यात खूप मोठ्या घडामोडी झाल्या. पण तो डगमगला नाही हरला नाही, तो लढत राहिला आणि जिंकत राहिला.
भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने हार्दिक पांड्यावर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये मोहम्मद कैफ खूप भावूक होताना दिसला आहे. हार्दिकला त्याचे अश्रू दाखवयाचे नव्हते. कोणी त्याची टिंगल टवाळी करावी असं त्याला वाटत नव्हते. नाही तर लोकांनी त्याची मस्करी केली असती आनंद घेतला असता. त्यांना तो आनंद उपभोगू द्यायचा नव्हता. स्वतःचे दुःख त्याने ते स्वतः जवळच ठेवून घेतले. लोकांनीही खूप सोशल मीडियावर ट्रोल केलं. कधी कधी शिवीगाळ ही केली, पण त्याने ते सगळं सहन केलं. सिंहा सारखा उभा राहिला भिडत राहिला.
IPL 2025 मध्ये इरफान पठाण कॉमेंट्री का करणार नाही? या कारणामुळे माजी अष्टपैलूला काढून टाकले आहे का?
अपमान करूनही तो हरला नाही. लोकांनी त्याला बाजूला सारलं त्याचा बद्दल खूप वाईट बोललं गेलं तरीही हसून सामोरा गेला. मेंटल टॉर्चर करूनही वर्ल्ड कप खेळाला चांगली गोलंदाजी केली जिंकला सुद्धा. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये झाम्पा ला सिक्स मारले.एवढे सहन करूनही तो उभा राहिला. खरंतर ते एवढे सोप्प नसते. पण त्याने सगळं अनुभव पणाला लावलं ७ महिन्यामध्ये त्याने दोनदा icc ट्रॉफी जिंकली आहे. त्याने अडचणीवर पलटवार केला. त्याच फार मोठं योगदान आहे. त्याच्यावर एक बायोपिक निघेल तेव्हा त्याचा हा प्रवास नक्कीच दाखवला जाईल. एवढ्या कठीण काळातही कसं शांत राहायच. कसं समोर जायचं ह्या गोष्टी त्याचा कडून शिकण्यासारख्या आहेत.
Hardik Pandya showed us what true mental strength actually is!!🫡 pic.twitter.com/yNU18fhtkT
— Mohammad Kaif (@MohammadKaif) March 19, 2025
IPL मध्ये तुम्ही पाहू शकता मुंबई इंडियन्स टॉप ४ मध्ये नक्कीच असेल. रोहित शर्मा त्याला सपोर्ट करताना दिसेल. MI चे फॅन्स हार्दिक ला सपोर्ट करताना दिसतील. कठीण काळात २ ट्रॉफी जिंकवून देणं फार मोठी अचिव्हमेंट आहे. क्रिकेट मधला तो शेर आहे जे काही योगदान आहे, त्याला सलाम आहे सॅल्यूट आहे..