फोटो सौजन्य - Irfan Pathan (X) सोशल मीडिया
Irfan Pathan’s new YouTube channel : आयपीएल २०२५ शनिवारपासून सुरू होत आहे, जिथे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध सामना करेल. या लीगच्या सुरुवातीपूर्वी, माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणला मोठा धक्का बसला आहे, जिथे त्याला आयपीएल २०२५ च्या समालोचकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. हे घडल्यानंतर, प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की तो समालोचन पॅनेलचा भाग का नाही. काही भारतीय खेळाडूंविरुद्ध बोलल्यामुळे त्याच्यावर अशी कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. काही वृत्तांत असाही दावा करण्यात आला आहे की बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान त्याने काही खेळाडूंबद्दल ज्या पद्धतीने बोलले त्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
IPL 2025 : पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट! केकेआर विरुद्ध आरसीबी सामना पावसामुळे रद्द झाला तर?
या सर्व बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल. पण दरम्यान, पठाणने आता स्वतःचे यूट्यूब चॅनेल उघडले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर त्याच्या नवीन चॅनल ‘सिद्धी बात’ च्या लाँचची घोषणा केली आणि चाहत्यांना त्याला प्रेम आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यूट्यूब चॅनल उघडल्यानंतर, तो लवकरच या मुद्द्यावर आपली बाजू मांडेल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून चाहत्यांना सत्य कळेल.
Mic on, filter off. #SeedhiBaat with #IrfanPathan – jahan baatein hoti hain asli.
Link yahi hai boss: https://t.co/NQixk8f3aN pic.twitter.com/xiOg3Ymyuv— Irfan Pathan (@IrfanPathan) March 22, 2025
आज आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. रविवारी म्हणजेच आयपीएल २०२५ च्या दुसऱ्याच दिनी क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी असणार आहे. कारण २३ मार्च रोजी दोन सामाने खेळवले जाणार आहेत.
सुनील गावस्कर, नवज्योत सिंग सिद्धू, आकाश चोप्रा, संजय मांजरेकर, मायकेल क्लार्क, मॅथ्यू हेडन, मार्क बाउचर, आरपी सिंग, शेन वॉटसन, संजय बांगर, वीरेंद्र सेहवाग, वरुण आरोन, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, हरभजन सिंग, शिखर धवन, अनिल कुंबळे, सुरेश रैना, केन विल्यमसन, एबी डिव्हिलियर्स, रॉबिन उथप्पा, आरोन फिंच, अंबाती रायुडू, मोहम्मद कैफ, पियुष चावला.
रवी शास्त्री, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, दीप दासगुप्ता, शेन वॉटसन, मायकेल क्लार्क, आरोन फिंच, वरुण आरोन, अंजुम चोप्रा, डब्ल्यूव्ही रमन, मुरली कार्तिक, इऑन मॉर्गन, ग्रॅमी स्वान, हर्षा भोगले, सायमन डौल, पोमी एमबांगवा, निक नाइट, डॅनी मॉरिसन, इयान बिशप, अॅलन विल्किन्स, डॅरेन गंगा, केटी मार्टिन, नताली जर्मनोस.