इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकातील भारत- पाकिस्तान, सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत जेव्हा भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला हस्तांदोलन न करण्याच्या धोरणाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने स्पष्ट उत्तर देण्याऐवजी, संघाचे लक्ष फक्त खेळावर असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘मला वाटते की आम्ही इथे फक्त क्रिकेट खेळायला आलो आहोत आणि आम्ही फक्त क्रिकेटबद्दलच बोलू. आम्ही क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही विषयावर बोलणार नाही. मी सुद्धा क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही विषयाचा विचार करत नाही. ती पुढे म्हणाली की, एक फॅन्स म्हणून भारत-पाकिस्तान सामने पाहतानाही तिला दडपण जाणवत असे आणि आता तर तिला त्याहूनही जास्त दडपण जाणवते. पण हा केवळ एक खेळ आहे, असे सांगून ती आपल्या सहकाऱ्यांना त्याचा आनंद घेण्यास सांगते.’
कर्णधार हरमनप्रीत कौरनेही भारत-पाकिस्तान सामन्यातील दबाव असल्याचे मान्य केले. हरमनप्रीत म्हणाली की, जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो, तेव्हा दबाव असणे स्वाभाविक आहे. कर्णधाराने पुढे सांगितले की, भारतीय संघ हा सामना इतर कोणत्याही सामन्याप्रमाणेच खेळेल आणि आपले १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेल.
२०२५ च्या आशिया कप दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक कतरण्यास नकार दिला. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे आणि या वर्षीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकातही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक केले नाही. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान हरमनप्रीत कौरनेही पाकिस्तानच्या फातिमा सनाशी हँडशेक केले नव्हते.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी २०२५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आता, तिचा संघ आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना करत, सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे ध्येय ठेवेल.
IND-W vs PAK-W: महामुकाबला! भारत-पाक भिडणार; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स






