आशिया कप स्पर्धा २०२२ (Asia Cup 2022) मध्ये भारत पाक यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला. भारतीय संघाच्या या विजयानंतर सर्वस्थरातून भारतीय संघाचे कौतुक होत असून मॅच फिनिशर हार्दिक पांड्यावरही (Hardik Pandya)कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच मोहम्मद शमीची (Mohammad Shami) पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jaha) हिने भारतीय संघाचे अभिनंदन करत असताना मोहम्मद शमीला टोमणे मारून डिवचले आहे.
मोहम्मद शमीची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. भारतीय क्रिकेट संघाला अभिनंदन देणाऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘“अभिनंदन. महान विजय… देशाला विजय मिळवून दिल्याबद्दल आपल्या वाघांचे खूप खूप आभार. हे व्हायला हवे होते. देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, इमानदार, देशभक्तांपासून वाचते, गुन्हेगार आणि महिलांच्या मागे लागणाऱ्यांमूळे नाही.”
हसीन जहॉं आणि मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. २०१८ मध्ये दोघांमध्ये वाद झालेला. हसीन जहाँने शमी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. शमी आणि हसीन यांनी २०१४ मध्ये लग्न झाले होते. २०१८ मधील वादानंतर तिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. हसीन सातत्याने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, रिल्स व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.