पाकिस्तानवर आयसीसीची कारवाई (फोटो- सोशल मिडिया)
वेस्ट इंडीजविरुद्ध ट्रिनिडाड येथील पहिल्या कसोटी सामन्यात ९० धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आयसीसीने वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास, खुर्रम शहजाद दंडात्मक कारवाई केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामना सुरू असताना या दोन्ही गोलंदाजांनी अतिउत्साहात केलेले सेलिब्रेशन त्यांना महागात पडले आहे. 17 व्या ओव्हरमध्ये खुर्रम शहजादने शाई होपला आउट केल्यावर त्याच्या जवळ जाऊन आक्रमक हावभाव करत सेलिब्रेशन केले होते. त्यामुळे आयसीसीमने त्याच्यावर कारवाई केले आहे. त्याच्या मॅच फीमधील 15 टक्के रक्कम कापली आहे. टासएच त्याच्या खातात 1 डिमेरिट पॉइंट अॅड केला आहे.
WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा
तर दुसरीकडे मोहम्मद अब्बासने जोमेल वारीकन आउट केल्यावर अब्बासने त्याच्या दिशेने जाऊन अत्यंत आक्रमक अन् चिथावणीखोर कृत करत सेलिब्रेशन केले. आयसीसीने त्याच्या खात्यात 1 डिमेरिट पॉइंट नोंदवला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. आता दुसरा सामना जिंकण्याचे आव्हान असणार आहे.
वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका
सध्या वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जात आहे. यातील पहिला सामना पार पडला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानवर 90 रन्सने विजय मिळवला आहे. या सिरिजमध्ये वेस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ झाली आहे.
चले तो चाँद तक, वरना…! कर्णधार झाला तरी नशीब फुटकचं; वेस्ट इंडिजविरुद्ध Babar Azam चा फ्लॉप शो
पाकिस्तानचा पराभव झाल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठ्या हालचाली झाल्या आहेत. पाकिस्तानची स्थिती वाईट झाली आहे. पाकिस्तानने बाहेरील देशांमध्ये कसोटी खेळताना सलग 8 वा सामना गमावला आहे. तसेच पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्सटेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.






