फोटो सौजन्य - JioHotstar
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : टीम इंडिया आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. आशिया कपमध्ये विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामनांच्या मालिकेवर असणार आहे. रोहित शर्माकडून कर्णधार पद काढून घेतल्यानंतर आता शुभमन गिल हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघामध्ये काही बदल करण्यात आले आहेत रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघामध्ये स्थान मिळालेले नाही.
या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमरा देखील भारतीय एक दिवसीय संघाचा भाग नसणार आहे. त्याच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णा अर्षदीप सिंह आणि मोहम्मद सिराज, हर्षित राणा गोलंदाजांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. तर रवींद्र जडेजाच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदरला संघास स्थान मिळाले आहे. त्याने मागील दोन कसोटी मालिकांमध्ये केलेल्या कामगिरीनंतर आत्ता वॉशिंग्टन सुंदर याला एक दिवसीय भारतीय संघात देखील स्थान मिळवता आले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे भारतीय संघात पुनरागमन
मे महिन्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी पार पडली होती त्यानंतर भारताचा संघ हा इंग्लंड दौऱ्यावर गेला होता याआधीच भारताचे दोन्ही महत्त्वाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावर केली होती आता तब्बल पाच महिन्यानंतर हे दोघेही एकत्र मैदानावर खेळताना दिसणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून रोहित शर्माचे अनेक व्हिडिओज हे सोशल मीडियावर व्हायरल होत होते त्याने या मालिकेसाठी भरपूर सराव करताना दिसला आहे त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
Here’s a look at #TeamIndia‘s Playing XI for the 1️⃣st ODI 👌 Nitish Kumar Reddy makes his ODI debut. 👍 Updates ▶ https://t.co/O1RsjJTHhM#AUSvIND pic.twitter.com/dWPlzUHqmu — BCCI (@BCCI) October 19, 2025
ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), नितिश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, हर्षित राणा