फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया-गौतम गंभीर : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारतीय क्रिकेट चाहते या पराभवानंतर प्रचंड निराश झाले आहेत. कारण या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब होती. विशेषत: वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली, ज्यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत, त्यांनी या मालिकेत सर्वाधिक निराशा केली. भारतीय संघाच्या फलंदाजीवर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिडनी कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये त्याने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.
Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युझवेंद्र चहलची सोशल मीडियावर भावुक पोस्ट
गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघाने अनेक मोठ्या मालिका गमावल्या आहेत. आधी श्रीलंका, नंतर न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. त्यानंतर गौतम गंभीरवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता, सिडनी कसोटीतील पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, “प्रत्येकाने उपलब्ध असल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यास वचनबद्ध असाल तर देशांतर्गत क्रिकेट खेळा.
Gautam Gambhir said, “I would always like everyone to play domestic cricket, if they’re available. If you’ve commitment to play red ball cricket then play domestic”. pic.twitter.com/y0eFtS3udd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 5, 2025
खरे तर टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेट का खेळत नाहीत, हा प्रश्न अनेक दिवसांपासून उपस्थित होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांसारखे वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. भारताची कोणत्याही संघासोबत कसोटी मालिका असेल तर हे खेळाडू मालिकेच्या काही दिवस आधी टीम इंडियासोबत सराव करताना दिसतात आणि जेव्हा हे खेळाडू कसोटी मालिकेत अपयशी ठरतात, तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत गौतम गंभीरने आता खेळाडूंना सल्ला दिला आहे.
खरे तर ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे सीनियर खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. विराट कोहलीने या मालिकेतील सर्व सामने खेळले आणि आपल्या बॅटने केवळ एक शतक
=098654321234u;’\ळकावले. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावानंतर कोहली सतत फ्लॉप ठरला. रोहितची कामगिरी सर्वात खराब असल्याने त्याला सिडनी कसोटीतून बाहेर बसावे लागले.