भारताचा इंग्लडवर 7 विकेट राखून दणदणीत विजय, अभिषेक शर्माची वादळी खेळी
IND vs ENG T-20 Match : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, अन् तो टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडचा संपूर्ण संघ 132 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियासमोर 133 धावांचे लक्ष्य होते. भारतीय संघाने हे लक्ष्य अवघ्या 12.5 षटकांमध्ये पूर्ण करीत गोऱ्या साहेबांवर 7 विकेट राखून मोठा विजय मिळवला.
टीम इंडियाची दमदार सुरुवात
भारतीय संघाच्या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. टी-20 मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसन आज 26 धावा करून बाद झाला. परंतु, दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्माची वादळी खेळी सुरूच होती. त्याने 34 चेंडूत 79 धावा केल्या. अभिषेक शर्माची वादळी खेळीने इंग्लडचे गोलंदाज चांगलेच चक्रावून गेले. कर्णधार सूर्यकुमार यादव आज खाते 0 न खोलता पॅव्हेलीनमध्ये परतला.
भारताचा विजय
𝗔 𝗱𝗼𝗺𝗶𝗻𝗮𝘁𝗶𝗻𝗴 𝘀𝗵𝗼𝘄 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗘𝗱𝗲𝗻 𝗚𝗮𝗿𝗱𝗲𝗻𝘀! 💪 💪#TeamIndia off to a flying start in the T20I series, sealing a 7⃣-wicket win! 👏 👏
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hoUcLWCEIP
— BCCI (@BCCI) January 22, 2025
इंग्लडची गोलंदाजी
इंग्लडच्या गोलंदाजीमध्ये गस अॅटकिन्सन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 2 ओव्हरमध्ये 38 धावा दिल्या. तर मार्क वूडने 3 ओव्हरमध्ये 25 धावा दिल्या.
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडची फलंदाजी ढासळली
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात पहिला टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जात आहे. यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सूर्याने घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लडला अवघ्या 132 धावांवर रोखण्यात यश आले. सुरुवातीपासूनच फलंदाजी घसरल्याचे पाहायला मिळाले.
अर्शदीपचा भेदक मारा
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर सुरुवातीपासूनच इंग्लडची फलंदाजी ढासळलेली पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लडची फलंदाज गडगडल्याचे पाहायला मिळाले. इंग्लडची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली, अर्शदीप सिंगने पहिल्याच ओव्हरमध्ये फिल्प सॉल्टला झेलबाद करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर लगेचच बेन डकेटला रिंकू सिंगद्वारे झेलबाद करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले.
वरुण चक्रवर्तीची जादू
अर्शदीपच्या जोरदार माऱ्याने इंग्लड चांगलीच जेरीस आली त्यानंतर वरुण चक्रवर्तीने एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ दोन विकेट घेत इंग्लडला मोठा धक्का दिला. हॅरी ब्रूकला त्रिफळाचित करीत इंग्लडला मोठा धक्का दिला. त्यानंतर लगेच लियम लिव्हिंगस्टोनला क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर हार्दिकची जादू पाहायला मिळाली.
हार्दिकची चांगली साथ
हार्दिक पांड्याने जेकब बेथल आणि जोफ्रा आर्चरला बाद केले. उपकर्णधार अक्षर पटेलने गस अॅटकीन्सन आणि जेमी ओव्हरटनला तंबूचा रस्ता दाखवला. वरुण चक्रवर्तीने इंग्लडचा कर्णधार जोस बटलरला नितीश रेड्डीद्वारे झेलबाद करीत तंबूचा रस्ता दाखवला. आज नितीश रेड्डीने अफलातून झेल घेत इंग्लडच्या कर्णधाराला तंबूत पाठवले.
भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लडने गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. मार्क वूडला रनआऊट करीत इंग्लडला 132 धावांवर रोखले. टीम इंडियासमोर अवघ्या 133 धावांचे लक्ष आहे. टीम इंडियाची फलंदाजी पाहता हा स्कोअर अगदी नगण्य आहे. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने पुढे असणार यात शंका नाही.