फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
रिषभ पंत : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना झाला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाच्या प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला, तर प्लेइंग ११ मध्ये रिषभ पंतला संघाधून वगळण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर ही जोडी प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला यष्टिरक्षक म्हणून निवडणार याबद्दल वादविवाद सुरू होता.
राहुल गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग आणि मधल्या फळीची जबाबदारी सांभाळत आहे. २०२३ च्या विश्वचषकात त्याची कामगिरीही अद्भुत होती, पण पंत संघात एक एक्स-फॅक्टर घेऊन येतो. तथापि, संघ व्यवस्थापनाने केएल राहुलसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण अडचण अशी होती की यशस्वी जयस्वाल वगळता टॉप ऑर्डरमध्ये डावखुरा फलंदाज नव्हता.
न्यूझीलंड क्रिकेट संघ संकटात, Champions Trophy आधी या स्टार खेळाडूला दुखापत! अडचणी वाढल्या
पण भारताला अक्षर पटेलच्या रूपात या समस्येवरही उपाय सापडला आहे. नागपूर एकदिवसीय सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अक्षरने शानदार अर्धशतक झळकावले आणि उपकर्णधार शुभमन गिलसोबत शतकी भागीदारीही केली. केएल राहुल आणि हार्दिक पंड्या सारख्या फलंदाजांवर अक्षरला संधी देण्यात आली. भारताचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि आता असे मानले जात आहे की अक्षर पटेलमुळे ऋषभ पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश आणखी लांबू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो बेंचवर बसलेलाच दिसून शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे तज्ज्ञ संजय मांजरेकर यांचेही असेच काहीसे मत आहे. माजरेकर म्हणाले की, नागपूर वनडेपूर्वी पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची चर्चा होती, परंतु अक्षर पटेलने त्यावर पूर्णविराम दिला आहे.
“सामना सुरू होण्यापूर्वी, माझ्याकडून असा सल्ला आला होता की कदाचित चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात घेऊन ऋषभ पंतला प्रयत्न करता येईल. तसेच, भारताच्या टॉप-६ किंवा ७ मध्ये डावखुरा खेळाडू असेल. अक्षर पटेल हा एक उत्तम पर्याय आहे कारण तो भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना आपण पाहिलेला खेळाडू आहे आणि त्याच्यात फलंदाजीचा स्वभाव आहे,” मांजरेकर ESPNcricinfo वर म्हणाले.
“पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळत होता. मधल्या षटकांमध्ये भारताला अडचणी आल्या आहेत जिथे त्यांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध सक्षम फलंदाज सापडले नाहीत. ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या देशात खेळली जात असल्याने, फिरकीचा खेळांवर मोठा परिणाम होणार आहे,” असे तो म्हणाला. “मधल्या फळीत अक्षर पटेल हा एक उत्तम पर्याय आहे, ज्यामुळे ऋषभ पंत परत येण्याची शक्यता कमी होऊ शकते. आता, त्यांच्याकडे एक डावखुरा फलंदाज आहे जो मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो,” मांजरेकर म्हणाले.