सौजन्य - BCCI सलग मायदेशात कसोटी मालिका न गमावण्यामध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर
IND vs NZ 2nd Test 2 days : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर भारतीय संघ ज्या पद्धतीने ऑलआउट झाला, त्याच पिचवर अर्ध्या दिवसात न्यूझीलंडने 195 धावांची खेळी केली. आज न्यूझीलंडने गोलंदाजीत भारतीय संघाला नामोहरम तर केलेच पुन्हा फलंदाजीत मोठी संयमी खेळी करीत 198 धावांची भर टाकत 301 धावांची आघाडी घेतली. कर्णधार टॅाम लॅथम आणि डेव्हीड कॅान्वेने डावाला सुरुवात केली. आज पुन्हा एकदा सुंदरने कॅान्वेला बाद करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले. कॅान्वे सुंदरच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर विल यंगला अश्विनने टीपले तर रचिन रवींद्रला पुन्हा एकदा वॉशिंग्टन सुंदरने क्लिन बोल्ड केले. त्यानंतर डॅरेल मॅचेललासुद्धा वॉशिंग्टन सुंदरने तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार टॅाम लॅथमला वॉशिंग्टन सुंदरनेच बाद केले. त्याला शतकापासून रोखण्यात सुंदरला यश आले. तोपर्यंत न्यूझीलंडने 301 धावांची आघाडी घेतली होती. तसे पाहता सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या पक्षात फिरला आहे, आता एखादा चमत्कारच भारतीय संघाला वाचवू शकतो.
किवींची सामन्यावर मजबूत पकड
Stumps on Day 2
New Zealand extend their lead to 301 runs
Scorecard ▶️ https://t.co/3vf9Bwzgcd#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uFXuaDb11y
— BCCI (@BCCI) October 25, 2024
टीम इंडियाचा पहिला डाव उधळला
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव उधळला, अक्षरश: आज उधळला. मॅचेल सॅंटनरने भारतीय संघाचा निम्म्यापेक्षा अधिक संघ एकट्याने तंबूत धाडला. यामध्ये त्याने विराट, जडेजा, सरफराज, अश्विनसारख्या महत्त्वाच्या विकेट घेत टीम इंडियाला कमजोर केले. आर अश्विनलासुद्धा सॅंटनरने बाद केले. शेवटी आलेला आकाशदीपला मिचेल सॅंटनरने क्लिनबोल्ड केले.
शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने केली डावाची सुरुवात
रोहित शर्मातर कालच खाते न उघडता तंबूत परतला होता. दुसऱ्या दिवशी आज डावाची सुरुवात शुभमन शुभमन आणि यशस्वी जयस्वालने केली. या तरुण जोडीने डावाची सुरुवात केलेली असताना शुभमन गिल सुरुवापतीपासून चाचपडत खेळत असल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या सॅन्टनरने आज धमाकेदार गोलंदाजी केली. त्याने २३.२ ओव्हरला शुभमन गिलला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजाला त्रिफळाचित करीत बाद केले. सॅन्टनरच्या २३.५ षटकांत विराट त्रिफळाचित झाला. विराट फुलटॅास आलेला चेंडूसुद्धा कळाला नाही. अवघ्या एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत आला.
सरफराज खान आणि ऋषभ पंतची जोडी ठरली फ्लाॅप
मागच्या कसोटीत धमाकेदार खेळी करणारा सरफराज खान आणि ऋषभ पंतची जोडी आज पूर्ण फ्लॅाप ठरली. ऋषभ पंतला ग्लेन फिलिप्सने ३०.५ ओव्हरला क्लिनबोल्ड करीत घरचा रस्ता दाखवला. तर सरफराज खान सॅन्टनरच्या चेंडूवर मिडआॅनला एक सोपा झेल देत बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन सॅन्टनरच्या चेंडूवर एल्बीडब्ल्यू बाद झालला. त्यानंतर जड्डू आणि वाॅशिंग्टनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रवींद्र जडेजा आणि सुंदरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु जडेजा सॅन्टनरच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर आकाशदीप सॅन्टनरच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला.
सॅन्टनरने निम्मा संघ बाठवला तंबूत
भारतीय क्रिकेट टीमच्या आज लागोपाठ ४ विकेट गेल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडकडून सॅन्टर टीम इंडियाला जखडून ठेवले. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळपट्टीने फिरकीपटूंना चांगलीच साथ दिली आहे. च्या दिवसात रविचंद्रन अश्विननंतर वाॅशिंग्टन सुंदरने धमाकेदार गोलंदाजीने किवींचा डाव उधळला आणि त्यांना २५९ धावांपार्यंतच रोखून धरले. सरफराज खानदेखील एक मोठा शॅाट मारण्याच्या नादात सोपा झेल मिडअॅानला देऊन बाद झाला. सॅन्टरने आज ४ विकेट घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुपारच्या सत्रापर्यंत निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. त्यामुळे आता मॅच कुठपर्यंत चालते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सॅंटनरला याच कसोटीत मिळाली संधी
गेल्या सामन्यात मिचेल सँटनरला संधी मिळाली नाही. मॅट हेन्री पहिल्या सामन्यात खेळला. पण दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड व्यवस्थापनाने मॅट हेन्रीला काढून सँटनरला संधी दिली. सँटनरने संघाच्या भरवशावर राहून चमकदार कामगिरी केली. सॅन्टनरने 48 डावात एकूण 58 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या कसोटीतही तो संघाचा भाग असू शकतो.