फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला : चॅम्पियन ट्रॉफीचा कहर सध्या जगभरामध्ये सुरु आहे. आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सामान सुरु आहे, तर काल न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या हाती त्यांच्या घराच्या मैदानावर निराशा हाती लागली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडने ६० धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर यजमान संघाला पुढील सामन्यात करो या मरो की स्थिती असणार आहे.
पाकिस्तानचा संघ मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पुढील सामन्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्ध जिंकावे लागणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण पाकिस्तानी संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हरवू शकेल का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. यावर आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत पाकिस्तान सामन्यावर वक्तव्य केले आहे सध्या त्याचे वक्तव्य प्रचंड चर्चेत आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा असा विश्वास आहे की भारताला हरवणे खूप कठीण आहे. मोहम्मद रिझवान आणि पाकिस्तान संघ आक्रमक क्रिकेट खेळण्यात अपयशी ठरले आहेत, असेही त्यांनी म्हटले.
शोएब अख्तरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामान्यांच्या बाबतीत त्याने त्याचे विचार व्हिडिओमध्ये मांडले आहेत. शोएब अख्तर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की आता पाकिस्तानसमोर आगामी सामन्यांमध्ये करा किंवा मरो अशी परिस्थिती समोर आहे. भारतीय संघ खूप मजबूत आहे, त्या भारतीय संघाला हरवणे कठीण आहे, पण शुभेच्छा पाकिस्तानी संघासोबत आहेत. पण मला खात्री आहे की पाकिस्तान संघ भारताला हरवण्यात यशस्वी होणार आहे. पुढे शोएब म्हणाला की पाकिस्तान संघाकडे दुसरा पर्याय नाही, पण तुम्ही नक्कीच आक्रमक क्रिकेट खेळू शकता.
या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर म्हणत आहे की तुम्ही पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहिला असेल. माझ्याइतकेच तुम्हीही निराश व्हाल. पाकिस्तान पूर्णपणे वेगळे क्रिकेट खेळत आहे, पाकिस्तानचे क्रिकेट जगाच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, हा संघ वेगळ्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहे. तुमच्याकडे कोणताही प्रभावशाली खेळाडू नाही, तुमच्या खेळाडूंचा स्ट्राईक रेट खूप कमी आहे, तुमचे खेळाडू १०० च्या स्ट्राईक रेटने खेळू शकत नाहीत. तो म्हणाला की आमचे गोलंदाज सहज धावा देत आहेत. पाकिस्तानी संघाबद्दल बोलायचं झालं तर संघाकडे ४ गोलंदाज आहेत तर इतर संघांवर नजर टाकली तर प्रत्येकाकडे ६-७ गोलंदाज आहेत.