फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्यांची भारताच्या संघाने सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये विशेषत: भारताच्या संघाच्या फलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. यामध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल याने अर्धशतक झळकावले होते तर विराट कोहली याने शतकीय खेळी खेळून आणखी एकदा स्वत: ला त्याने सिद्ध केले आणि त्याच्या करिअरचे त्याने 52 वे शतक झळकावले.
रायपूरमधील शाहीर वीर नारायण सिंग स्टेडियमवर जानेवारी २०२३ मध्ये एकमेव वनडे सामना झाला होता, जेव्हा मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी खेळपट्टीच्या सीमचा वापर करून न्यूझीलंडला १०८ धावांत गुंडाळले होते. भारताने ३० षटके शिल्लक असताना आठ विकेट्सने विजय मिळवला. डिसेंबर २०२३ मध्ये येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी२० सामनाही भारताने २० धावांनी जिंकला. या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवार, ३ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.हा दुसरा एकदिवसीय सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल तर टॉस त्याच्या अर्धा तास आधी दुपारी १:०० वाजता होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व चॅनेलवर प्रसारित केले जाणार आहे. हा सामना JioHotstar अॅपवर देखील थेट प्रक्षेपित केला जाईल.
#TeamIndia lead the series 1-0! 💪💙 Will @klrahul & the #MenInBlue ride the momentum to clinch the series in the 2nd ODI, or will the Proteas spark a comeback? 👀🔥#INDvSA 2nd ODI 👉 WED, 3rd DEC, 12:30 PM pic.twitter.com/Kx7t4Wm5EV — Star Sports (@StarSportsIndia) December 2, 2025
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली गेल्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी पाहता, भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल होण्याची शक्यता कमी आहे. गोलंदाजी विशेषतः मधल्या षटकांमध्ये प्रभावी नव्हती, परंतु विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजी कामगिरीने भरीव धावसंख्या निश्चित केली. संघ सामान्यतः त्यांच्या विजयी संयोजनात फारसे बदल करत नाहीत. प्लेइंग इलेव्हनबाबत राहुल काय निर्णय घेतो हे पाहणे बाकी आहे.






