फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. या मालिकेचा पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची कमालीची कामगिरी राहिली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या सामन्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची आहे.
पण तुम्हाला रायपूरच्या या मैदानावरील टीम इंडियाच्या कामगिरीची आकडेवारी माहिती आहे का? आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या मैदानावर कशी कामगिरी केली आहे? तर, या मैदानाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल . या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय सामना झाला आहे.
या मैदानावर फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंड संघाने भारत दौरा केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना २१ जानेवारी २०२३ रोजी खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण किवी संघ फक्त १०८ धावांवर गारद झाला. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन विकेट घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने दोन आणि हार्दिकनेही दोन विकेट घेतल्या.
न्यूझीलंडच्या १०९ धावांच्या प्रत्युत्तरात, टीम इंडियाकडून रोहित शर्माने ५१ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. मात्र, विराट कोहली फक्त ११ धावा करून बाद झाला. मात्र, भारताने २१ व्या षटकात ८ विकेट्सने सामना जिंकला.
रांची येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १३५ धावा केल्या, तर रोहित शर्माने ५७ धावा केल्या. यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव करता आला. आता, रायपूरमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा रोहित आणि कोहलीवर असतील. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तिसरा सामना हा 6 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा मालिकेचा शेवटचा सामना असणार आहे त्यानंतर टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.






