फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारताचा अंडर 19 संघ आजपासून 2026 च्या विश्वचषकाचा शुभारंभ करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा यूएसएविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा बुलावायो येथे 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका झाली यामध्ये भारताचे संघाने एकतर्फी मालिका जिंकून चांगली तयारी तयारी गेली आहे. भारतीय संघाचे कर्णधार पद हे आयुष म्हात्रेकडे असणार आहे तर संघाचा उपकर्णधार हा विहान मल्होत्रा असणार आहे.
आयपीएलचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी पहिला सामन्यांमध्ये सलामी वीर फलंदाज म्हणून फलंदाजी करताना दिसेल. सध्या मागील काही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीची दमदार कामगिरी पाहायला मिळाले आहे. भारतीय क्रिकेटचा हा त्यांची नजर वैभव सूर्यवंशी आणि आयुष मात्रे यांच्याकडे असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार याची माहिती सविस्तर देण्यात आली आहे.
भारतीय संघाचा विश्वचषकाचा पहिला सामना हा भारत विरुद्ध यूएसए या दोन संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना जिम बॉम्बे येथील पुलवाओ येथे आयोजित केला जाणार आहे. भारताचा हा पहिला विश्व दशकाचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होणार आहे तर या सामन्याचे नाणेफेक हे बारा वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. भारत विरुद्ध युएसए या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओ हॉटस्टारवर क्रिकेटच्या हातांना मोबाईलवर पाहता येणार आहे तर या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे.
भारतीय संघात, कर्णधार आयुष म्हात्रे व्यतिरिक्त, सर्वांच्या नजरा बिहारच्या खळबळजनक फलंदाज वैभव सूर्यवंशीवर असतील, ज्याने अलीकडेच आपल्या फलंदाजीने प्रसिद्धी मिळवली आहे. विहान मल्होत्रा, आरोन जॉर्ज आणि दीपेश दीपेंद्रन सारखे स्टार खेळाडू देखील चमकण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे, उत्कर्ष श्रीवास्तवच्या नेतृत्वाखालील यूएसए संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
Come meet the future stars 🌟 Day one of the #U19WorldCup begins today! pic.twitter.com/BV7bTIkvsY — ICC (@ICC) January 15, 2026
भारत: आयुष म्हात्रे (कर्णधार), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, डी. दीपेश, मोहम्मद अनन, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन ए. पटेल, हरवंश सिंग, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी
यूएसए: उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), अदनीत झांब, शिव शनी, नितीश सुदिनी, अद्वैत कृष्णा, साहिर भाटिया, अर्जुन महेश, अमरिंदर गिल, सबरीश प्रसाद, आदित कप्पा, साहिल गर्ग, अमोघ रेड्डी अरेपल्ली, ऋत्विक अप्पीडी, रायन ताज, रिबशा.






