भारताचा श्रीलंकेवर विजय (फोटो- ट्विटर)
ट्राय सिरिजमध्ये पार पडला भारत विरुद्ध श्रीलंका सामना
ऋतुराज गायकवाडने लगावले शानदार शतक
भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
India A Vs SRI Lanka A: आज ट्राय सिरिजमधील पाहिला सामना भारत अ विरुद्ध श्रीलंका अ या दोन संघांमध्ये पार पडला. एकदिवसीय सामन्यात भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली. तर श्रीलंकेचा कर्णधार सहान अरच्चिगेने 74 रन्सची खेळी केली. भारताने श्रीलंकेला 278 रन्सचे टार्गेट दिले होते. हा सामना चुरशीचा झाला. अखेरच्या ओव्हरपर्यन्त सुरू असलेला हा सामना अखेर भारताने श्रीलंकेवर 8 रन्सने विजय मिळवला आहे.
भारताच्या संघाची फलंदाजी
टॉस जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी केवळ 14 रन्स करून आउट झाला. तर प्रभसीमरन सिंग 2 रन करू शकला. त्यानंतर प्रियांश आर्य 32 रन्सची खेळी करून विचित्रपद्धतीने रन आउट झाला. त्यानंतर भारताचा डाव कर्णधार तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाडने सांभाळला. ऋतुराज गायकवाडने खणखणीत शतक लगावले. तर तिलक वर्माने 60 रन्सची खेळी केली. आयुष बडोनी 24 तर सुयश शेडगेने 26 रन्सची खेळी केली. ऋतुराज गायकवाडने आपला फॉर्म दाखवला आहे. शानदार फलंदाजी करताना त्याने 112 बॉलमध्ये शानदार शतक लगावले आहे. या खेळीत त्याने तीन सिक्स आणि तीन फोर मारले. त्याचे हे शतक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोजले जाणार नाही. ऋतुराज आतापर्यंत 21 शतके केली आहेत. शतक केल्यावर ऋतुराज गायकवाड आउट झाला.
श्रीलंकेची गोलंदाजी
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चमिका करुणारत्नेने 1 विकेट घेतली. मोहम्मद शिराजने महत्वाच्या 2 विकेट घेतल्या. वानुजा सहानने 1 विकेट घेतली. साधारण श्रीलंकेने शानदार गोलंदाजी करत भारतीय संघाला 277 रन्सवर रोखले.
श्रीलंकेची फलंदाजी
अविष्का फर्नांडो आणि निरोशन डिकवेला यांनी 278 रन्सचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेची सुरुवात केली. अविष्का फर्नांडो आणि निरोशन डिकवेला प्रत्येकी 47 आणि 45 रन्सची शानदार खेळी केली. सदिरा समरविक्रमाने 46 रन्सची खेळी केली. तर श्रीलंकेकडून कर्णधार सहान अरच्चिगेने 74 रन्सची सर्वाधिक खेळी केली.
भारत अ संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा ,प्रबसिमरन सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, निहाल वढेरा , आयुष बदोनी, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुतार, हर्षित राणा, यश दयाल , आकाश दीप, वैशाक विजयकुमार.
IND A Vs SL A: अबब! श्रीलंकेवर बरसला ‘ऋतुराज’; ठोकले खणखणीत शतक, पहिल्याच सामन्यात…
श्रीलंका अ संघ: लसिथ क्रूशपुल्ले, शेवॉन डॅनियल, नुवानिदु फर्नांडो, पवन रथनायके , सहान अराचिगे, अहान विक्रमसिंघे , मिनोद भानुका, दुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, दिलशान मदुशंका , मथीशा पथिराना






