ऋतुराज गायकवाडचे शानदार शतक (फोटो- सोशल मीडिया)
वैभव सूर्यवंशी केवळ 14 रन्सवर झाला आउट
आजपासून ट्राय सिरिजला झाली सुरुवात
ऋतुराज गायकवाड अन् तिलक वर्माची शानदार खेळी
India A Vs Sri Lanka A: आजपासून श्रीलंकेत ट्राय सिरिजची सुरुवात झाली आहे. आज पाहिला सामना श्रीलंका ए आणि इंडिया ए या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. कर्णधार तिलक वर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंक ए विरुद्ध वैभव सूर्यवंशी अपयशी ठरला. मात्र ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माने शानदार खेळी केली.
भारत अ संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली. चौथ्या नंबरवर खेळण्यासाठी आलेल्या ऋतुराज गायकवाडने शानदार शतकी खेळी केली आहे. ट्राय सिरिजसाठी कर्णधार असलेल्या तिलक वर्माने देखील चांगली कामगिरी केली.
भारताच्या दवाची सुरुवात प्रभसिमरन सिंह आणि वैभव सूर्यवंशीने केली. मात्र दोन्ही फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. वैभव सूर्यवंशी केवळ 14 रन्सवर आउट झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार तिलक वर्माने भारताचा डाव सांभाळला. प्रियांश आर्य 32 रन्सकरून आउट झाला. त्यानंतर गायकवाड आणि तिलकने डाव सावरला.
IND A vs SL A: वैभव सूर्यवंशीची जादू ‘अपयशी’, केवळ 14 धावांवर आऊट; चाहते नाराज
ऋतुराज गायकवाडने आपला फॉर्म दाखवला आहे. शानदार फलंदाजी करताना त्याने 112 बॉलमध्ये शानदार शतक लगावले आहे. या खेळीत त्याने तीन सिक्स आणि तीन फोर मारले. त्याचे हे शतक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोजले जाणार नाही. ऋतुराज आतापर्यंत 21 शतके केली आहेत. शतक केल्यावर ऋतुराज गायकवाड आउट झाला. मोठ्या खेळीत रूपांतर करण्यास तो अपयशी ठरला.
या त्रिकोणीय मालिकेत भारत आणि श्रीलंका यांच्यासोबत अफगाणिस्तान हा तिसरा संघ आहे. साखळी टप्प्यात सर्व संघ प्रत्येकी दोन सामने खेळतील. म्हणजेच एकूण चार सामने. यानंतर, गुणतालिकेतील अव्वल दोन संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतील. याचा अर्थ वैभवला इथे आपले कौशल्य दाखवण्यासाठी अजून तीन सामने आहेत. मात्र, श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर धावा करणे त्याच्यासाठी सोपे नसेल. आगामी सामन्यांमध्ये तो कशी कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे.
भारत अ संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा ,प्रबसिमरन सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, निहाल वढेरा , आयुष बदोनी, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुतार, हर्षित राणा, यश दयाल , आकाश दीप, वैशाक विजयकुमार.
Vaibhav Sooryavanshi Reaction: मन तुटलं…हरल्यानंतर वैभवची पहिली भावूक प्रतिक्रिया, पहा वैभवची Insta Story
श्रीलंका अ संघ: लसिथ क्रूशपुल्ले, शेवॉन डॅनियल, नुवानिदु फर्नांडो, पवन रथनायके , सहान अराचिगे, अहान विक्रमसिंघे , मिनोद भानुका, दुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, दिलशान मदुशंका , मथीशा पथिराना






