ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) या संघात सुपर १२ फेरीतील सामना रंगणार आहे. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे महत्वाचे होते, मात्र नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघाचं सेमी फायनल मधील स्थान पक्क झालं आहे. मात्र ग्रुप २ मधील प्रथम स्थान टिकून ठेवण्यासाठी भारताला झिम्बाब्वे विरुद्ध सामना जिंकणे आवश्यक असणार आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात ६ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना होणार असून दुपारी १: ३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर सामन्याच्या अर्धातास पूर्वी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात.
[read_also content=”भारतीय संघाची सेमी फायनल मध्ये धडक https://www.navarashtra.com/sports/the-indian-team-reached-the-semi-finals-342273.html”]
भारतीय संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर झिम्बाब्वेच्या संघाने मागील चार सामन्यांपैकी एकच सामना जिंकला आहे. तर, दोन सामन्यात पराभव पत्कारला आहे. याशिवाय, त्यांचा एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. झिम्बाब्वेचा संघ ३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
भारताचा संभाव्य संघ :
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.