फोटो सौजन्य - JioHotstar
वैभव सूर्यवंशी – एमएस धोनी व्हिडीओ : राजस्थान रॉयल्सचा आजचा सामना हा शेवटचा सामना ठरला. यामध्ये राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आणखी एकदा क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले आहे. त्याला या सिझनमध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसंन याच्या स्थानावर संघामध्ये घेण्यात आले होते. त्यानंतर त्याने मैदानावर कहर केला आणि संघाला यशस्वी जयस्वालसोबत दमदार सुरुवात करून दिली. सामन्यानंतरचा आता वैभव सूर्यवंशी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओनंतर त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू हे एकमेकांना शुभेच्छा देत असताना जेव्हा वैभव सूर्यवंशी याच्यासमोर एमएस धोनी येतो तेव्हा त्याने जे केले त्यानंतर त्यांच्यासमोर सोशल मीडियावर कौतुकाता वर्षाव केला जात आहे. जेव्हा सर्व खेळाडू हे हात मिळवत असतात, तेव्हा जेव्हा वैभव सूर्यवंशी समोर एमएस धोनी येतो तेव्हा तो खाली वाकतो आणि महेंद्रसिंग धोनी याचा आशीर्वाद घेतो यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या पाठीवर शाब्बाशीची थाप देतो. त्याचबरोबर दोघे एकमेकांना पाहुन हसले.
Vaibhav Suryavanshi touched MS Dhoni’s feet🥺❤️
This is what Dhoni has earned🛐 pic.twitter.com/HVSPNI8hcB
— Surya (@SuryaDhoni22) May 20, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली, डेव्हॉन कॉनवे फक्त १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला तर उर्विल पटेलला त्याचे खातेही उघडता आले नाही. रविचंद्रन अश्विनने १३ धावा केल्या तर रवींद्र जडेजा फक्त १ धाव करू शकला. दरम्यान, सलामीवीर आयुष म्हात्रेने ४३ धावा केल्या. याशिवाय, डेवाल्ड ब्रेव्हिसनेही ४२ धावा जोडल्या.
CSK vs RR : वैभव सूर्यवंशीचे अर्धशतक! संघाला मिळवून दिला विजय! चेन्नईचा ६ विकेट्सने पराभव
शेवटी शिवम दुबेने ३९ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटी खूप हळू फलंदाजी केली आणि १७ चेंडूत फक्त १६ धावा केल्या. ज्यामुळे संघ २० षटकांत २१० धावांऐवजी केवळ १८७ धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सकडून युधवीर सिंग आणि आकाश माधवाल यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. वानिन्दु हसरंगाने ४ षटकांत फक्त २७ धावा देऊन १ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवला.
१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने १९ चेंडूत ३६ धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने ३३ चेंडूत ५७ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसननेही ४१ धावा जोडल्या. शेवटी, ध्रुव जुरेलने नाबाद ३१ धावा केल्या आणि आपल्या संघाला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्जकडून रविचंद्रन अश्विनने २ विकेट्स घेतल्या. यासोबतच, आयपीएल २०२५ मधील राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपला. या संघाने १४ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर १० सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.