हरमनप्रीत कौर (फोटो- सोशल मिडिया)
12 जूनपासून सुरू होणार महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा
15 जून रोजी भारत पाकिस्तान येणार आमनेसामने
हरमनप्रीत कौर करणार भारताचे नेतृत्व
ICC Women’s T-20 World Cup 2026: सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. पुढील आठवड्यापासून आयपीएलचे प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. आयपीएल संपताच चाहत्यांना महिला टी-20 वर्ल्ड कप पाहायला मिळणार आहे. 12 जूनपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. दरम्यान त्या आधी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने एक महत्वाचे विधान केले आहे.
भारतीय महिला संघाने 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवला आहे. आता आगामी आयसीसी टी२० विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले आहे. 2025 मधील विजय केवळ ट्रॉफीपुरता मर्यादित नसून महिला क्रिकेटची एक नवी सुरुवात असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले आहे.
काय म्हणाली हरमनप्रीत कौर?
2025 च्या वर्ल्डकप जिंकणे हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक क्षण होता. ही तर केवळ सुरुवात आहे. या विजयामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. आम्ही आता विजयाची सवय लावून घेतली आहे. हा विजय केवळ एक ध्येय नव्हते. तर भारतीय महिला क्रिकेटच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे.
ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर
महिला क्रिकेटच्या सर्वात मोठ्या टप्प्याचे उलटी गिनती सुरू झाली आहे. आयसीसीने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तारखेसह महिला टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पुन्हा एकदा, दोन कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी स्पर्धेत आमनेसामने येतील, जिथे स्पर्धा केवळ विजय किंवा पराभवाची नाही तर प्रतिष्ठेची देखील असेल. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक यावर्षी १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळला जाईल आणि यावेळी १२ संघ सहभागी होतील.
मोठी घडामोड! INDIA ‘A’ संघात बीसीसीआयने केला बदल; आता ‘या’ जबरदस्त खेळाडूची झाली एन्ट्री
ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स यांना गट १ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लीग टप्प्यातच हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. १४ जून रोजी एजबॅस्टन येथे भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. महिला क्रिकेटमध्येही ही स्पर्धा नेहमीच रोमांचक असते आणि यावेळीही स्टेडियम खचाखच भरण्याची अपेक्षा आहे. अलिकडच्या स्पर्धांमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली आहे, तर ऑस्ट्रेलिया सहा वेळा चॅम्पियन आहे. त्यामुळे या गटाला “ग्रुप ऑफ डेथ” म्हटले जात आहे. पाकिस्तानमध्ये मोठ्या मंचावर उलटफेर करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे भारत-पाकिस्तान सामना आणखी महत्त्वाचा बनतो.






