बीसीसीआयने इंडिया ए संघात केला बदल (फोटो- सोशल मिडिया)
श्रीलंकेविरुद्ध इंडिया ए टीममध्ये अचानक बीसीसीआयने केला बदल
हर्ष दुबे ऐवजी अनुकूल रॉयची संघात एन्ट्री
टीम इंडिया ए श्रीलंकेविरुद्ध भिडणार
INDIA ‘A’ Vs SRI Lanka ‘A’: 9 जूनपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी इंडिया ए संघात मोठे बदल केले आहेत. बीसीसीआयने महत्वाचे बदल या संघात केले आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी इंडिया ए संघात हर्ष दुबेची निवड करण्यात आली होती. मात्र त्याच्याऐवजी आता दुसरा खेळाडू तिथे खेळणार आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात.
बीसीसीआयने हर्ष दुबेची निवड अफघणिस्तानविरुद्धच्या मालिकेविरुद्ध भारतीय संघात केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी घरगुती कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी हर्ष दुबेची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची इंडिया ए संघातून जागा रिक्त झाली आहे.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी आणि वन डे संघाची घोषणा केली आहे. या सिरिजमध्ये हर्ष दुबेला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. हर्ष दुबेला इकडे संधी मिळाल्याने अनुकूल रॉयची वर्णी इंडिया ए संघात करण्यात आली आहे.
Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार
‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री
बीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. भारतीय संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. जून महिन्यात सामने होणार आहेत बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूना संधी दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.जून महिन्यात भारत अ आणि श्रीलंका अ तसेच ‘अफगाणिस्तान अ’ या संघांमध्ये सामने होणार आहे. या वन-से ट्राय सिरिजमध्ये अनेक युवा खेळाडू दिसणार आहेत. त्यामुळे आशियाई क्रिकेटमधील युवा खेळाडूंमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने या संघाची धुरा तिलक वर्माकडे सोपवली आहे. तर या संघाकडून वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या यांना निवडकर्त्यांनी मोठी संधी दिली आहे. त्यामुळे ‘भारत अ’ संघाची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. भविष्यातील सिनियर टीम इंडियाच्या दृष्टीने या युवा खेळाडूंसाठी हा दौरा सुवर्णसंधी मानला जात आहे.
ई-सिगरेट ओढा अन् उपकर्णधार व्हा! INDIA Team A मध्ये जबाबदारी देताच BCCI ट्रोल, ‘हे’ खेळाडू बाहेर
बीसीसीआयने प्रियांश आर्या आणि वैभव सूर्यवंशीसह, आयुष बडोनी, निशांत सिंधू या नवख्या खेळाडूना संधी दिली आहे. श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ विरुद्धची ही त्रिकोणीय मालिका या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार करेल, असे बीसीसीआयचे म्हणणे असल्याचे समोर येत आहे.






