फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
IPL 2025 Scoreboard : गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या सामन्या क्रमांक ११ मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला सहा धावांनी पराभूत केले. सीएसकेचा हंगामातील हा सलग दुसरा पराभव होता, तर राजस्थान रॉयल्सने विजयाचे खाते उघडले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ९ विकेट्स गमावून १८२ धावा केल्या. आरआरकडून नितीश राणाने ३६ चेंडूत १० चौकार आणि पाच षटकारांसह सर्वाधिक ८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसके संघाला ६ विकेटच्या मोबदल्यात फक्त १७६ धावा करता आल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत ६३ धावा केल्या, पण त्याचा डाव व्यर्थ गेला. या सामन्यातील पराभवानंतर आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलची स्थिती काय आहे ते जाणून घेऊया.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे. आरसीबीच्या संघाने आतापर्यत २ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे,दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे यामध्ये दिल्लीच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून ४ गुण मिळवले आहेत. तिसऱ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्सचा संघ आहे, लखनौच्या संघाने २ सामने खेळले आहेत त्यामधील त्यांनी १ सामना जिंकला आहे आणि १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चौथ्या स्थानावर गुजरात जायंट्सचा संघ आहे गुजरातच्या खात्यात २ गुण आहेत.
Sailing At The Top ⛵@RCBTweets lead the Points Table after Match 1️⃣1️⃣ of #TATAIPL 2025 👌
How has the start been for your favourite team? ✍ pic.twitter.com/2fvbCunCAY
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
पंजाब किंग्सचा संघ गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आहे. पंजाबचा आतापर्यत एकच सामना झाला आहे त्यामध्ये त्यांनी गुजरात टायटन्सला पराभूत करून २ गुण मिळवले आहेत. कोलकाता नाईट राइडर्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे तीन सामने झाले आहेत यामध्ये संघाने १ सामन्यात विजय मिळवला आहे तर २ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा संघ २ विजयासह सातव्या स्थानावर आहे. हैदराबादच्या संघाने या सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात फक्त विजय मिळवला आहे त्यानंतर संघाला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या २ गुणांसह हैदराबाद आठव्या स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्सच्या संघाने कालच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले या विजयासह राजस्थानच्या खात्यामध्ये संघाला २ गुण मिळाले आहेत. राजस्थानचा संघ पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. तर शेवटच्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ दहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने एकही सामना जिंकलेला नाही.