क्रीजवर गोंधळानंतर Rohit Sharma रनआउट; हिटमॅन भडकला? मैदानात नेमकं काय घडलं, गिलचा खुलासा
जिओहॉटस्टारवर बोलताना जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली, ‘ मला आठवतंय, मी माझा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळले होते. ड्रेसिंग रूममध्ये हरमनप्रीत कौरने आम्हाला सामन्याच्या दबावाकडे दुर्लक्ष करू नका असे सांगितले. ती म्हणाली की बाहेरून दबाव आहे, कारण आम्हाला भारत-पाकिस्तानचा इतिहास माहीत आहे. चाहत्यांना आमच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील आम्हाला माहीत आहे.’ ती पुढे म्हणाली, ‘माझ्या बिल्डिंगचा वॉचमनसुद्धा मला म्हणतो की, कोणाकडूनही हारा, पण पाकिस्तानकडून नाही.’ हा त्या प्रकारचा दबाव आहे, कारण लोकांना क्रिकेट आवडते. त्यांना ही स्पर्धा आवडते. भारतीय संघ एका मोठ्या ध्येयाने पुढे वाटचाल करत आहे, आणि ते ध्येय म्हणजे टी-२० विश्वचषक ट्रॉफी उंचावणे.’
जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली, ‘एक संघ म्हणून, आम्ही नेहमी ट्रॉफी जिंकण्याचा विचार करतो. हे आमच्या दैनंदिन कामाचा एक भाग आहे. आमचा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप विचार करता, तेव्हा तुम्ही त्या दिशेने वाटचाल करू लागता.ही आमच्या संघाची संकल्पना आहे. आम्ही २०२५ च्या विश्वचषकादरम्यान हेच केले होते. अमोल सरांनी आम्हाला येथेही तेच करण्यास सांगितले आहे आणि आम्ही ते पुढेही करत राहू.’
भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील, क्रांती गौड, रेणुका सिंग.
पाकिस्तान : मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, आयेशा जफर, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, नतालिया परवेझ, तुबा हसन, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल.






