कधी होणार पुरुष एकदिवसीय विश्वचषक? (फोटो- सोशल मीडिया)
2027 मध्ये होणार आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप
ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते स्पर्धा
तीन देशांमध्ये खेळवला जाणार वर्ल्ड कप
ICC ODI World Cup 2027: सध्या उद्यापासून आयसीसी महिला विश्वचषक 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. भारताचा संघ 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध अपला पहिला सामना खेळणार आहे. महिला वर्ल्ड कपची उत्सुकता असतानाच आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. आयसीसी ओडीआय वर्ल्ड कप 2027 मध्ये होणार आहे. त्याबाबत आधी माहिती जाणून घेऊयात.
क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच ‘आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक’ च्या तारखांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हा महासंग्राम दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. याच्या तारखांबाबत माहिती समोर आली आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2027 मध्ये होणार आहे. मात्र त्याच्या तारखा अद्याप समोर आल्या नव्हत्या. दरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तीन देशांमध्ये हा वर्ल्ड कप होणार असला तरी सर्वाधिक वाटा हा दक्षिण आफ्रिकेचा असणार आहे. 54 पैकी 41 सामने एकट्या दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत. झिम्बाब्वेमध्ये 8 ते 10 सामने होऊ शकतात. तर तब्बल 24 वर्षांनी आफ्रिका खंडात पुरुष वन-डे विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.
ICC Women’s T20 World Cup 2026: मिशन वर्ल्ड कप! ‘या’ ताकदीच्या जोरावर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?
उद्या म्हणजेच 12 जूनपासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. सुरुवातीचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. तर भारताचा संघ 14 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान 14 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. दरम्यान यंदाचा वर्ल्डकप भारत जिंकण्याची प्रबळ कारणे जाणून घेऊयात.
फलंदाजी – भारतीय महिला संघ आपल्या आक्रमक आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. इंग्लंडमध्ये दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला आहे. जेमिमा रोड्रिग्स मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी ओळखली जाते. तर रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत.
IND Vs ENG: रिचा घोषची झुंजार खेळी व्यर्थ; अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय
रिचा घोष: रिचा घोष ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा समजला जात आहे. कालच्या सराव सामन्यात देखील रिचा घोषने 68 रन्सची शानदार खेळी केली होती. टी 20 फॉर्मटमध्ये रिचा घोष अत्यंत आक्रमक खेळीसाठी ओळखली जाते.






