फोटो सौजन्य : Lucknow Super Giants
ऋषभ पंतचे शतक : लखनऊच्या एकाना मैदानावर लखनऊ विरुद्ध बंगरू यांच्यामध्ये सामना सुरू आहे. आजच्या सामन्यांमध्ये लखनऊच्या संघाची धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली. एडन मारक्रमच्या अनुपस्थितीत आज लखनऊचा संघ मैदानात उतरला आज त्याच्या जागेवर मॅथ्यू ब्रीट्झके प्लॅन इलेव्हन मध्ये संधी देण्यात आली होती. त्याची लवकर विकेट गमावली त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. आणि आजच्या सामन्यात पुन्हा एकदा त्याची कमाल दाखवली आणि शतकीय खेळी खेळली.
ऋषभ पंत याने या सिझनमध्ये काही विशेष कामगिरी केली नाही तो आयपीएलचा इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला पण तो त्याप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयने नुकत्याच कसोटी क्रिकेटसाठी संघाची घोषणा केलेल्या संघामध्ये त्याला उपकर्णधार पद देण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा हा फॉर्म पाहून भारतीय संघासाठी नक्कीच चांगली चिन्ह दिसत आहेत. ऋषभ पंतने आजच्या सामन्यात 54 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या.
KKR ची एक चूक पडली महागात, पंजाब किंग्सला झाला फायदा! IPL 2025 मध्ये चमकला श्रेयस अय्यर
मागील बऱ्याच सामन्यामध्ये त्याने खराब कामगिरी केल्यामुळे त्याला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. या सिझनमध्ये त्याने फक्त 1 अर्धशतक ठोकले होते. आजच्या सामन्यात त्याने धुव्वादार फलंदाजीने भारताला दाखवुन दिले आहे आणि त्याला भारतीय कसोटी संघामध्ये का उपकर्णधारपद दिले आहे हे त्याने दाखवुुन दिले आहे. ऋषभ पंत याने आजच्या सामन्यात नाबाद खेळी खेळली त्याने 61 मध्ये 118 धावा केला यामध्ये त्याने आठ षटकार मारले त्याचबरोबर 11 चौकार ही मारले.
𝐀 𝐑𝐢𝐬𝐡𝐚𝐛𝐡 𝐏𝐚𝐧𝐭 𝐬𝐡𝐨𝐰 🍿
Second #TATAIPL hundred for the #LSG skipper 💯
Lucknow has been thoroughly entertained tonight 👏
Updates ▶ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB | @RishabhPant17 pic.twitter.com/dF32BWDKmS
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
आजच्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर मिचेल मार्शने ऋषभ पंतची चांगली साथ दिली. मार्शने आज 67 धावांची खेळ खेळली तर ऋषभ पंतने शतक ठोकले. या दोघांची जोरावर संघाने 227 धावा केल्या आणि तीन विकेट्स गमावले. दोन्ही संघांचा आज शेवटचा सामना आहे मंगरूळच्या संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास टॉप दोन मध्ये स्थान पक्के होईल आणि जर आज पराभव झाला तर त्यांना मुंबई इंडियन्स सोबत सामना खेळावा लागणार आहे.