फोटो सौजन्य - gujarat_titans सोशल मीडिया
First innings of Mumbai Indians vs Gujarat Titans match: मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्याची पहीली इंनिग संपली आहे, या सामन्यामध्ये संघाचे नाणेफेक जिकूंन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गुजरात टायटन्सचे दोन्ही फलंदाज साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी कमालीची सुरूवात करून दिली. फलंदाजांच्या जोरावर गुजरात टायटन्सने संघासाठी १९७ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. गुजरातच्या संघाने पहिला विकेट 8.3 ओव्हरमध्ये गमावला. शुभमन गिलचा गुजरातने पहिला विकेट गमावला यामध्ये शुभमने संघासाठी २७ चेंडुमध्ये ३८ धावा केल्या.
IPL 2025 : या वर्षी RCB आयपीएलचे विजेतेपद जिंकणार का? एबी डिव्हिलियर्सच्या उडाली उत्तराने खळबळ
गुजरात टायटन्सचा दुसरा विकेट जोस बटलर याचा गेला. बटलरने संघासाठी २४ चेंडूंमध्ये ३४ धावा करून बाद झाला. आयपीएल २०२५ चा पहिल्या सामना खेळणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने कमालीची कामगिरी केली. यामध्ये त्याने ४ ओव्हरमध्ये २ विकेट्स घेतले. शाहरुख खानला हार्दिक पंड्याने बाहेरचा रस्ता दाखवला. शाहरुख खानने ७ चेंडूंमध्ये ९ धावा केल्या आणि बाद झाला. साई सुदर्शनने आणखी एकदा त्याच्या कामगिरीने चाहत्यांची मन जिंकली आहेत. त्याने आणखी एकदा अर्धशतकीत खेळी खेळली. त्याने आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावले आहे. साई सुदर्शनने ४१ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या.
Innings Break! #MI make a comeback with the ball, but #GT finish with 1⃣9⃣6⃣ on the board! 👌
Who will end up with 2⃣ points tonight? 🤔
Scorecard ▶ https://t.co/lDF4SwnuVR #TATAIPL | #GTvMI | @gujarat_titans | @mipaltan pic.twitter.com/o5xdBI0AlE
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
शेरफेन रदरफोर्ड संघासाठी ११ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, मुजीब रहमान सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला आणि कॅप्टन हार्दिक पांड्याने दोन विकेट्स घेतले.
दोन्ही संघाच्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुबंई इंडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता, या सामन्यात चेन्नईच्या संघाने मुबंईला 4 विकेट्ने पराभूत केले होते. तर गुजरात टायटन्सच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सशी सामना झाला होता या सामन्यात पंजाब किंग्सने 11 धावांनी पराभव केला होता.
आता मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरु झाली आहे, यामध्ये रोहित शर्माच्या त्याचबरोबर सूर्यकुमारच्या फलंदाजीवर नजर असणार आहे. मागील काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये आहे त्यामुळे तो कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे,