फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२५ मधील प्रवास : काल इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ५० वा सामना पार पडला. यामध्ये मुबंई इंडियन्स विरूध्द राजस्थान रॅायल्स यांच्यामध्ये लढत झाली. हा सामना मुबंई इंडियन्सच्या संघाने एकतर्फी जिंकला. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाने पॉईंट टेबलमध्ये पहिले स्थान गाठले आहे. मुंबईच्या संघाने या सीझनमध्ये कमालीची कामगिरी मागील सहा सामान्यांमध्ये केली आहे. मुंबईच्या संघाने पहिला सामना त्यांच्या मुख्य कर्णधार हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत खेळला होता. संघाने या सीझनमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती पण सध्या संघ आता कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सची आतापर्यतचा प्रवास कसा राहिला आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
मुंबई इंडियन्सचा या सीझनमधील पाहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झाला होता. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले होते एवढेच नव्हे तर संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मुंबईचा दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला होता या सामन्यात देखील मुंबईच्या संघाने ३६ धावांनी गमावला होता. या सीझनचा तिसरा मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झाला होता. या सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने या सीझनचा पहिला विजय नावावर केला होता.
6️⃣ on the trot & now they’re on 🔝
A massive 1⃣0⃣0⃣-run win for #MI to sit right where they want to 👊
Scorecard ▶ https://t.co/t4j49gXHDu#TATAIPL | #RRvMI | @mipaltan pic.twitter.com/20KEle7S6n
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चौथा सामना झाला होता हा सामना देखील संघाने गमावला होता. मुंबई इंडियन्सचा पाचवा सामना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झाला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. सहावा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला या सामन्यात मुंबईच्या संघाने विजय मिळवला आणि त्यानंतर एकदाही मागे वळून पहिले नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सहाव्या सामान्यांमधून संघाने सलग सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह आणि १४ गुणांसह संघाने पहिले स्थान गाठले आहे.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ६ मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळवला जाणार आहे, हा सामना वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. संघाचे अजून तीन सामने शिल्लक आहेत. यामध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध , त्याचबरोबर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याविरुद्ध होणार आहे. मुंबई इंडियन्सचे दोन सामने घरच्या मैदानावर खेळणार आहेत तर एक सामना धर्मशाळा येथे खेळवला जाणार आहे.