फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मिडीया
Rajasthan Royals vs Mumbai Indians 1st innings report : राजस्थान रॉयल्सच्या होमग्राउंडवर संघाचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात रियान परागने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात रोहित शर्माने या सीझनचे आणखी एक अर्धशतक झळकावले आहे. रोहितने या हंगामामध्ये तिसरे अर्धशतक झळकावले आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. यासह मुंबईच्या संघाने २ विकेट्स गमावून २१७ धावा केल्या आहेत. आता राजस्थानच्या संघ विजयासाठी २१८ धावा हव्या आहेत. आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
आजच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रायन रिकल्टन याने संघासाठी आज दमदार खेळी खेळली. ३८ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ षटकार आणि ७ चौकार मारले. रोहित शर्माने आणखी एक संघासाठी अर्धशतक झळकावले. रोहित शर्माने आजच्या सामन्यात ३६ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या आणि त्याने विकेट गमावली. यामध्ये त्याने एकही षटकार न मारता ९ चौकार मारले. आजच्या शेवटच्या ५ ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी ७१ धावा केल्या.
Innings Break!
A dominant batting display from #MI batters powers them to 2️⃣1️⃣7️⃣ 💪
Will #RR light up Jaipur in reply?
Updates ▶ https://t.co/t4j49gXHDu#TATAIPL | #RRvMI | @rajasthanroyals | @mipaltan pic.twitter.com/OfxhKvJw9x
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
आजच्या सामन्यात मुंबईचे चार फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. यामध्ये चारही फलंदाजांनी कमालीची फलंदाजी केली. तिसऱ्या स्थनावर सूर्यकुमार यादवने फलंदाज केली. सूर्यकुमार यादवने आज संघासाठी २३ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या आणि नाबाद राहिला. यामध्ये त्याने २ षटकार आणि ४ चौकार मारले आणि मोठ्या लक्ष्यपर्यत संघाला घेऊन गेले. हार्दिक पंड्या आज लवकर फलंदाजीला आला होता. त्याने संघासाठी २३ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार आणि ६ चौकार मारले. तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने ९४ धावांची भागीदारी केली.
RR vs MI : मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने गुलाबी जर्सी का घातली? जाणून घ्या यामागील खरे कारण
राजस्थानच्या गोलंदाजीचे सांगायचे झाले तर रियान पराग याने संघासाठी १ विकेट घेतला तर महेश तीक्षणा याने संघाला १ विकेट मिळवून दिला. रियान परागने रोहित शर्माला बाहेरचा रस्ता दाखवला तर महेश तीक्षणा याने रियन रिकल्टन याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.