रियान कुक यांनी दिला राजीनामा (फोटो- istockphoto)
हेड कोच रायन कूक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे डच क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले आहे. त्यांचा चार वर्षांचा कालावधी संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नेतृत्वर नेदरलँड्स संघाने मोठे यश प्राप्त केले आहे. त्यांच्या नेतृत्वात नेदरलँड्सच्या संघाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपले नाव मोठे केले आहे.
चार वर्षांपूर्वी रायन कूक यांची नेदरलँड्सच्या हेड कोचपदी नियुक्ती झाली होती. अखेर त्यांनी कौटुंबिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर येत आहे. नेदरलँड्स क्रिकेट संघ क्रिकेट वर्ल्ड कप लीग मध्ये चांगले प्रदर्शन करत असताना त्यांनी आपले पद सोडले आहे. त्यामुळे नेदरलँड्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
रायन कूक यांनी 2022 मध्ये नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाचा हेड कोच म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर नेदरलँड्सच्या संघाने चांगली कामगिरी केली होती. नेदरलँड्स संघाने क्वालिफाय केले होते. 2022 आयसीसी पुरुष क्रिकेट स्पर्धेत क्वालिफाय केले होते. ऑस्ट्रेलियामधील स्पर्धेत नेदरलँड्सच्या संघाने अनेक मोठ्या संघांचा पराभव केला होता.
बातमी अपडेट होत आहे…






