न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका : विश्वचषक २०२३ मध्ये आज न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा १०२ वा सामना असेल. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने जास्त विजय मिळवले आहेत. किवी संघाने एकूण ५१ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने ४१ सामने जिंकले आहेत. ८ सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत राहिला. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्यांमध्ये कुमारा संगकाराने सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. जाणून घ्या, न्यूझीलंड-श्रीलंका वनडे इतिहासातील १० खास आकडे…