फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया
3rd match of the series between Pakistan and New Zealand : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या ५ सामान्यांची T२० मालिका सुरु आहे. या मालिकेचे आतापर्यत ३ सामने झाले आहेत. या मागील सामान्यांबद्दल बोलायच झालं तर न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी करून मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे आता मालिका नावावर करण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला फक्त विजयाची गरज होती. आज मालिकेचा तिसरा सामना खेळवण्यात आला, या सामन्याचे आयोजन ईडन पार्क येथे करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने कमाल करून न्यूझीलंडच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत केले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज सामना झाला, या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यांमध्ये पहिले फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने २०४ धावा केल्या. न्यूझीलंडच्या संघाने मार्क चॅपमनच्या जोरावर २०२४ धावा केल्या. यामध्ये मार्क चॅपमनने संघासाठी ९४ धावांची दमदार खेळी खेळली. तर मायकेल ब्रेसवेल याने संघासाठी ३१ धावा केल्या. आजच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे.
Batters lead the charge as Pakistan mount a comeback in the T20I series against New Zealand 🔥#NZvPAK 📝: https://t.co/HjGGA2sMhO pic.twitter.com/egzUkCqIgW
— ICC (@ICC) March 21, 2025
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या संघाने १९.५ ओव्हरमध्ये सर्व फलंदाजांना बाद केले. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने २०४ धावा केल्या. यामध्ये पाकिस्तानच्या संघासाठी हॅरिस रौफने ३ विकेट्स घेतले, तर अब्बास आफ्रिदी याने संघासाठी २ विकेट्सची कमाई केली. त्याचबरोबर पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीने संघासाठी २ विकेट्स घेतले. पाकिस्तानच्या फलंदाजांमध्ये हसन नवाज याने संघासाठी शतक ठोकले. हसन नवाज याने संघासाठी ४५ चेंडूंमध्ये १०५ धावांची खेळी खेळली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने संघासाठी अर्धशतक ठोकले. सलमान अली आघा याने ५१ धावांची खेळी खेळली.
या मालिकेचा चौथा सामना रविवारी २३ मार्च रोजी खेळवला जाणार आहे, यामध्ये जर न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवल्यास संघ मालिका नावावर करेल आणि जर पाकिस्तानच्या संघाने सामना जिंकल्यास मालिकेमध्ये २-२ अशी बरोबरी होईल. त्यामुळे मालिका आणखीनच मनोरंजक होईल. या मालिकेचा शेवटचा सामना २६ मार्च रोजी होणार आहे.